घरअर्थजगतBudget 2022-23: अर्थसंकल्पातील हलवा समारंभाची परंपरा यंदा खंडीत, कर्मचाऱ्यांना 'लॉक इन' करण्याची...

Budget 2022-23: अर्थसंकल्पातील हलवा समारंभाची परंपरा यंदा खंडीत, कर्मचाऱ्यांना ‘लॉक इन’ करण्याची पद्धत काय ?

Subscribe

येत्या मंगळवारी म्हणजे १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते २०२२-२३ साठीचा पेपरलेस अर्थसंकल्प मांडला जाईल. यंदाच्या वर्षी बजेट पेपरलेस असल्यानेच बजेटची छपाई होणार नाही. त्यामुळेच बजेटची छपाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यंदा हलवा समारंभाएवजी मिठाई देण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी पेपरलेस स्वरूपात सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प 2022-23 संसदेत सादर झाल्यानंतर मोबाईल ॲप वर उपलब्ध होणार आहे. मोबाइल ॲप द्विभाषिक (इंग्रजी आणि हिंदी) असून ते Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

अर्थसंकल्पातील लॉक इनची पद्धत काय ?

केंद्रीय अर्थसंकल्प तयारी अंतिम टप्प्यात असून सध्या सुरू असलेली महामारी आणि आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन अर्थसंकल्प आखणीत सहभागी मुख्य कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी थांबवण्यासाठी (“लॉक-इन” ) हलवा समारंभाऐवजी मिठाई देण्यात आली. अर्थसंकल्पाबाबत गुप्तता राखण्यासाठी, अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी अधिकाऱ्यांना “लॉक इन” केले जाते. नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या बजेट प्रेसमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना थांबवण्यात येते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच हे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना भेटू शकतात. अर्थसंकल्पा दरम्यान गोपनियतेचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांचे लॉक इन करण्यात येते.

- Advertisement -

मोबाईल एपवर अर्थसंकल्प

2021-22 वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प प्रथमच पेपरलेस स्वरूपात सादर करण्यात आला होता. संसद सदस्य (खासदार) आणि सामान्य जनतेला अर्थसंकल्प दस्तावेज सुलभरीत्या उपलब्ध व्हावा यासाठी “युनियन बजेट मोबाईल ॲप ” देखील सुरू करण्यातआले. 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरकेंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध होईल.

अर्थसंकल्पीय भाषण, वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यपणे अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदान मागण्या (DG), वित्त विधेयक इत्यादींचा समावेश असलेले 14 केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तावेज मोबाइल ॲप मध्ये उपलब्ध आहेत. मोबाइल ॲप दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे आणि ते अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

- Advertisement -

अर्थसंकल्प कुठे उपलब्ध होईल ?

हे अॅप केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून देखील डाउनलोड करता येईल. सामान्य लोकांसाठी अर्थसंकल्पीय दस्तावेज केंद्रीय बजेट वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -