घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022: कोट्यवधी शेतकऱ्यांना मोदी सरकार आज देणार गिफ्ट; PM Kisan योजनेची...

Budget 2022: कोट्यवधी शेतकऱ्यांना मोदी सरकार आज देणार गिफ्ट; PM Kisan योजनेची रक्कम वाढणार?

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प २०२२ (Budget 2022) सादर करणार आहेत. त्यामुळे सध्या गरीबांपासून ते श्रीमतांपर्यंत सर्वांची नजर आजच्या अर्थसंकल्पावर आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सर्व लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच कोट्यवधी संख्येत असलेल्या शेतकऱ्यांना देखील यंदाच्या अर्थसंकल्पात दिलासा देणाऱ्या गोष्टी असण्याची आशा आहे. दरम्यान पाच राज्यांच्या निवडणुका आणि एक वर्षांपासून सुरू असणारे शेतकरी आंदोलनामुळे म्हटले जात आहे की, अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनाबाबत (PM Kisan Samman Nidhi Yojana) मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

पीएम किसान योजने अंतर्गत देशातील १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. ही रक्कम दर चार महिन्याला दोन-दोन हजाराच्या हफ्त्याने बँक अकाऊंट्समध्ये ट्रान्सफर केली जाते. दरम्यान आज अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देणारी रक्कम वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार ६ हजारहून ८ हजार रुपये किंवा १० हजार रुपये प्रतिवर्षाला देऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान १० फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये विविध टप्प्यात मतदान सुरू होत आहे. तसेच कृषी कायद्यांविरोधात २०२० आणि २०२१मध्ये जवळपास १ वर्ष शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. या शेतकरी आंदोलनामध्ये पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना समावेश होता. तसेच पीएम किसान योजनेचा लाभ उत्तर प्रदेशचे जवळपास अडीच कोटीहून अधिक शेतकरी आणि पंजाबचे २५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्वरुपात आणखीन मजबूत बनवण्यासाठी पीएम किसान योजनेतील रक्कम वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते.


हेही वाचा – Budget 2022: स्वस्त आणि महागाईवर असणार सर्वसामान्यांची नजर; यंदाच्या बजेटचा खिशावर किती होणार परिणाम?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -