घरदेश-विदेशभारताने पाकिस्तानचे विमान पाडलेच; हा घ्या पुरावा!

भारताने पाकिस्तानचे विमान पाडलेच; हा घ्या पुरावा!

Subscribe

भारताने पाकिस्तानचे एफ-16 विमान न पाडल्याचा दावा पाकिस्तान करत होते. यासंदर्भात अमेरिकेच्या एका नियतकालिकेमध्येही छापून आले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या अमेरेकी बनावटीचे एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे जाहीर केले आहेत.

पाकिस्तानने अमेरिकेकडून जितके एफ – 16 लढाऊ विमान विकत घेतले आहेत ते जसेच्या तसे पाकिस्तानजवळ सुरक्षित आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकेने दोन दिवसांपूर्वी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेने आपले स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेच्या नियतकालिकेने केलेला दावा खोटा असून यासंदर्भात सबळ पुरावे वायुसेने आहेत, असे भारतीय वायुसेनेने स्पष्ट केले आहे. ‘पाकिस्तानने एफ – 16 विमानामार्फत भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला याचा पुरावा वायुसेनेकडून असून मीग- 21 या विमानाने एफ – 16 या विमानाला पाडण्याचे सबळ पुरावे भारतीय वायुसेनेकडे आहेत’, असे भारतीय वायूसेनेचे अधिकारी एअर व्हाइस मार्शल आरजीके कपूर यांनी सांगितले.

काय आहे नेमकं प्रकरण?

भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळे उद्धवस्त केले होते. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे एअर स्ट्राईक करण्यात आले होते. हा एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या जिवारी लागला होता. या एअर स्ट्राईकनंतर २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे तीन एफ-16 विमान जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या सीमेभागातून भारतात शिरले. या विमानांनी बॉंब हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या घुसखोरीची माहिती भारतीय वायुसेनेला मिळाली. भारतीय वायुसेनेचे मीग-21 विमानाने पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले. परंतु, पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले गेलेच नाही, असे स्पष्टीकरण पाकिस्तानने केले होते. यासंदर्भात अमेरिकेच्या ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकेने एफ-16 विमान न पडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे यासंदर्भातील पुरावा भारतीय वायुसेनेन जाहीर केला आहे. भारताचे मीग-21 विमान विंग कमांडर अभिनंदन वर्थमान चालवत होते, अशी माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचे एफ-१६ विमान भारतात आल्याचे पुराव्यासंदर्भातील चित्रदेखील रडारवर आढल्याची माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -