घरताज्या घडामोडीइंग्लंडमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या निम्म्याहून कमी; मुस्लीम, हिंदूंची संख्या वाढली

इंग्लंडमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या निम्म्याहून कमी; मुस्लीम, हिंदूंची संख्या वाढली

Subscribe

इंग्लंडच्या इतिहासात पहिल्यांदाच ख्रिश्चनांची लोकसंख्या कमी झाली आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून कमी झाली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या जनगणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार इंग्लंडमध्ये मुस्लिम आणि हिंदूंच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे.

इंग्लंडच्या इतिहासात पहिल्यांदाच ख्रिश्चनांची लोकसंख्या कमी झाली आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून कमी झाली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या जनगणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार इंग्लंडमध्ये मुस्लिम आणि हिंदूंच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. (united kingdom population of Christians remained less than half for first time in history of England number of Muslims and Hindus increased)

2021 च्या जनगणनेचे आकडे जाहीर करताना ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने (ONS) सांगितले की, इंग्लंड आणि वेल्समध्ये ख्रिश्चनांची एकूण लोकसंख्या आता 46.2 टक्के (27.5 दशलक्ष) आहे. 2011 मध्ये ते 59.3 टक्के होते. अशाप्रकारे ख्रिश्चनांच्या लोकसंख्येमध्ये 13.1 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

इग्लंडमधील मुस्लिम लोकसंख्या आता 4.9 वरून 6.5 टक्के झाली आहे. पूर्वी मुस्लिम लोकसंख्या 27 लाख होती. ही लोकसंख्या आता 39 लाख झाली आहे. तसेच, हिंदू लोकसंख्या 1.5 टक्क्यांवरून 1.7 टक्क्यांवर पोहोचली आहे. 2011 च्या आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये 8.18 लाख हिंदू होते. त्यांची संख्या आता 10 लाख झाली आहे.

शिवाय, ‘कोणताही धर्म नाही’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांची संख्या तब्बल 37.2 टक्क्यांवर पोहोचली आहे. म्हणजेच प्रत्येक तीनपैकी एकापेक्षा जास्त व्यक्ती या वर्गात येतात. 2011 मध्ये हा आकडा 25 टक्के होता. ज्यू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली नाही आणि एकूण लोकसंख्येच्या 0.5 टक्के आहे.

- Advertisement -

ONS नुसार ब्रिटनची राजधानी लंडनच्या उत्तरेकडील हॅरो येथे सर्वाधिक 25.8 टक्के हिंदू लोकसंख्या असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते. याशिवाय लेस्टर शहरात हिंदू लोकसंख्या 17.9 टक्के आहे.


हेही वाचा – जेल की बेल? नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -