महिलांच्या सुरक्षितेसाठी तयार केली ‘लिपस्टिक गन’

अवघ्या ६५० रुपयांमध्ये 'लिपस्टिक बंदूक' तयार केली आहे.

up varanasi man develops lipstick gun new security gadget for women
महिलांच्या सुरक्षितेसाठी तयार केली 'लिपस्टिक गन'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ वारासणीत आता गुन्हेगारी कमी होणार आहे. एका तरुणांने महिलांवरील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी खास हत्यार तयार केलं आहे. या तरुणांचे नावं श्याम चौरसिया आहे. सध्या आपल्या बॅगेत किंवा पर्समध्ये लिपस्टिक हा प्रकार असतोच. त्यामुळे याचा विचार करून त्याने ‘लिपस्टिक बंदूक’ तयार केली आहे. या लिपस्टिक बंदूकचा वापर फक्त शूट करण्याव्यतिरिक्त पोलिसांना फोन करण्यासाठी देखील होणार आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, श्याम हा अशोक इंस्टीट्यूट मध्ये अर्धवेळ नोकरी करतो. यापूर्वी देखील श्यामने महिलांच्या सुरक्षितेसाठी उपकरणं तयार केली आहेत. पण ही ‘लिपस्टिक बंदूक’ खूपच उपयुक्त आहे. या लिपस्टिक बंदूकचे नावं ‘स्मार्ट अँटी टीझिंग लिपस्टिक गन’ असं आहे. ही लिपस्टिक बंदूक हुबेहुबे लिपस्टिक सारखी दिसते. महिलांसाठी ही खूप महत्त्वाची आहे.

श्यामने सांगितलं की, ‘या बंदुकीत एक ट्रिगर लावलेल आहे. तसंच ट्रिगर दाबल्यावर बंदुकीचा मोठा आवाज येतो. या बंदुकीचा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकू येतो. जर एखादी महिला अडचणीत असेल तर अशा गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांचे लक्ष वेधू शकेल आणि तिचा बचाव होईल. याशिवाय या लिपस्टिक बंदूकमध्ये ब्लूटूथ सेन्स डिव्हाइस असून तो स्मार्टफोनला ट्रिगरद्वारे कनेक्ट केलेला आहे. लिपस्टिकमधील फायर ट्रिगर दाबताच पोलिसांना आणि कुटुंबातील सदस्यांना थेट फोन लागला जाईल. विशेष म्हणजे लाईव्ह लोकेशनच्या मदतीने पोलीस थेट घटनास्थळी पोहोचू शकतात. पोलीस येईपर्यंत महिला स्वतःच्या रक्षणासाठी लिपिस्टिक बंदूकीतून सतत फायरिंग करू शकते.’

ही लिपस्टिक बंदुक तयार करण्यासाठी सहा महिने लागले. ७.७ पॉइंट बॅटरी आणि ब्लूटूथचा वापर ही तयार करण्यासाठी केला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर याची चार्जिंग खूप दिवस टिकू शकते. ही बंदूक बनवण्यासाठी फक्त ६५० रुपये खर्च झाला आहे. या बंदूकीचे वजन सुमारे ७० ग्रॅम इतकं आहे.


हेही वाचा – नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सर्वोच्च न्यायालयात अजब याचिका!