घरताज्या घडामोडीविद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी शिक्षिका करतात वधूंना नटवण्याचे काम

विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी शिक्षिका करतात वधूंना नटवण्याचे काम

Subscribe

शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच जनगणना आणि निवडणूकीचे काम करावे लागते हे आपल्याला माहितच आहे. तो सरकारी कामाचा एक भाग म्हणून आपण त्याकडे बघतो. पण उत्तर प्रदेशमधील महिला शिक्षकांवर चक्क सामूहिक विवाह समारंभात वधूंना नटवण्याची जबाबदारी दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने शिक्षिकांना नवऱ्यांना नटवण्याचे दिलेले आदेश मागे घेतले आहेत.

उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील नौगढ ब्लॉकमध्ये आज मुख्यमंत्री विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यातील १८४ वधूंना नटवण्याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांनी तुघलकी फर्मान काढत २० महिला शिक्षकांवर सोपवली. सोमवारी वाटप करण्यात आलेल्या या आदेशपत्रात शाळेच्या मुख्याध्यापिकांपासून शिक्षिकांचे नाव होते. हा आदेश वाचून सर्वच महिला शिक्षिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्यानंतर या आदेशाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली. बघता बघता हे प्रकरण मीडियापर्यंत पोहचले. यावर अनेकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना झापले. त्यानंतर धाबे दणाणलेल्या अधिकाऱ्यांनी आदेश मागे घेत असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

विशेष म्हणजे महिला शिक्षकांवर वधूंना नटवण्याची जबाबदारी देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांना अशी कामे दिली जात होती. असा गौप्यस्फोट शिक्षिकांनीच केला आहे. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -