घरदेश-विदेशउत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा राजीनामा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा राजीनामा

Subscribe

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्या यांच्याकडे सोपवला राजीनामा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्या यांच्याकडे आज (मंगळवार,०९ फेब्रुवारी) सोपवला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राज्यातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रावत हे भाजपचे मुख्यमंत्री होते त्यांच्या राजीनाम्यानंतर आता बुधवारी नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तराखंडमध्ये अनिल बलूनी, अजय भट्ट आणि मंत्री धन सिंह रावत हे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत केंद्रीय पर्यवेक्षक रमन सिंह आणि दुष्यंत गौतम देहरादूनला पोहचणार आहेत. भाजपचे शिष्ठमंडळाची बैठक झाल्यावर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा स्विकारल्यानंतर उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजभवनात येऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचा राजीनामा स्विकारुन राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा देण्यापूर्वी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात तासापेक्षा अधिक वेळ चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर ही बैठक झाली असल्याचे समजते आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री पदासाठी या नावांची चर्चा

उत्तराखंडचे पुढील मुख्यमंत्री म्हणून तीन नावे प्रामुख्याने आघाडीवर आहेत. राज्यसभा खासदार अनिल बलूनी, नैनीतालचे लोकसभेचे खासदार अजय भट्ट आणि कॅबिनेट मंत्री धनसिंग रावत यांच्यातील एकाला राज्याच्या पुढील मुख्यमंत्री
निवडण्यात येणार येईल. तसेच सतपाल महाराजांच्या नावाचा देखील या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत समावेश आहे. या संदर्भात त्यांनी नुकतेच संघातील प्रमुख नेत्यांची भेट घेतली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -