घरदेश-विदेशVande Bharat : लवकरच धावणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन; किती असणार तिकीट दर?

Vande Bharat : लवकरच धावणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन; किती असणार तिकीट दर?

Subscribe

या स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या कर्मचारी आणि अभियंत्यांना जोधपूरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण केंद्र हे जोधपूरमध्ये उभारण्यात येणार असून यात स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या दुरुस्ती आणि देखभालची कार्यशाळाही येथेच असणार आहे.

नवी दिल्ली : देशात वंदे भारत एक्सप्रेसने मोठी क्रांती झाली आहे. या वंदे ट्रेनमुळे प्रवाशांच्या प्रवास हा आरामदायी आणि वेळ वाचवणार आहे. वंदे भारतच्या यशानंतर लवकरच स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन ही जोधरपूर-दिल्ली-मुंबई या मार्गावर धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या स्लीपर वंदे भारत ट्रेनची ट्रायल काही दिवसात सुरू होणार आहे. यानंतर स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण होईल.

जोधपूर-दिल्ली-मुंबईदरम्यान स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. या ट्रेनला 16 ते 24 डबे असणार आहेत. ही स्लीपर वंदे भारत ट्रेन ही मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली असून ही ट्रेन आधुनिक सुविधांनी लक्झरी प्रीमियम ट्रेन असणार आहे. यात प्रत्येक कोचमध्ये टॉयलेट आणि एक मिनी पॅन्ट्री असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “हा विजय अंतिम नाही…”, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर Bilkis Bano च्या घरच्यांची प्रतिक्रिया

अशी असणार स्लीपर वंदे भारत ट्रेन

स्लीपर वंदे भारत ही ट्रेन जोधपूर-दिल्ली-मुंबईदरम्यान पहिल्यांदा धावणार आहे. या ट्रेनमध्ये कोचमध्ये आरामदायी आसनव्यवस्था असणार असून ही ट्रेन 160 किलोमीटर वेगाने धावणार आहे. यात जवळपास 823 बर्थ असणे असणार असून 16 डब्यांपैकी 11 एसी-थ्री टायर, 4 एसी टू-टायर आणि एक फर्स्ट क्लास कोट असणार आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी स्वातंत्र बर्थ राखीव असेल. तसेच जोधपूर-दिल्ली-मुंबई पहिल्या स्लीपर ट्रेनचे भाडे हे जवळपास 1200 ते 2000 हजार रुपये असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CM Shinde Vs Thackeray : उंटावर बसून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही; शिंदेंचा ठाकरेंना टोला

या स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या कर्मचारी आणि अभियंत्यांना जोधपूरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण केंद्र हे जोधपूरमध्ये उभारण्यात येणार असून यात स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या दुरुस्ती आणि देखभालची कार्यशाळाही येथेच असणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -