घरदेश-विदेशLokSabha Election : पंतप्रधान मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन? तृणमूल खासदाराने केली तक्रार

LokSabha Election : पंतप्रधान मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन? तृणमूल खासदाराने केली तक्रार

Subscribe

नवी दिल्ली : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील चिलकलुरिपेट येथील निवडणूक रॅलीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार साकेत गोखले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 17 मार्च रोजी पलानाडू जिल्ह्यातील बोप्पुडी गावात एनडीएच्या निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले होते. यावेळी ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आंध्र प्रदेश निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीची प्रत टीएमसी खासदार साकेत यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले की, या प्रकरणी मी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. निवडणुका सुरू असताना आणि आचारसंहिता लागू असताना न्यायालयांना निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करण्याची परवानगी नसते. त्यामुळे निवडणूक आयोगानेच पंतप्रधान मोदींवर कारवाई करावी, असे गोखले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Shrinivas Pawar : सख्ख्या भावांना एकमेकांविरोधात…, अमोल मिटकरी यांचा शरद पवारांना टोला

निवडणूक आयोगाच्या 2014 च्या अधिसूचनेचा हवाला देत एका युझरने सांगितले की, SPG सुरक्षा असलेले लोक सरकारी वाहने वापरू शकतात. त्यावर गोखले म्हणाले की, हे प्रकरण फक्त बुलेटप्रूफ आणि जॅमर कारसारख्या एस्कॉर्ट वाहनांसाठी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, आयएएफ हेलिकॉप्टरचा वापर या अंतर्गत येत नाही.

भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी भाजपने पैसे दिले असतील तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर का निवडले, याचे स्पष्टीकरण द्यावे, असे खासदार गोखले म्हणाले. आता निवडणूक आयोग यावर का प्रतिक्रिया देते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा – CJI on Electoral Bonds : सारे काही प्रसिद्धीसाठी, मला तोंड उघडायला लावू नका…; कोर्टातच भडकले सरन्यायाधीश

सरकारी यंत्रणेचा वापर केल्याने इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र

आचारसंहितेच्या नियमांमध्ये निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणा वापरण्यास मनाई आहे. विशेष म्हणजे, इंदिरा गांधींना 1975 मध्ये याच कारणासाठी अपात्र ठरवण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -