घरट्रेंडिंग...आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन तोंडावर आपटले!

…आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन तोंडावर आपटले!

Subscribe

आइस हॉकी खेळताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन तोंडावर आपटल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आजवर आपण सोशल मीडियावर अनेक फनी व्हिडिओ पाहिले असतील. त्यामध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांचे व्हिडिओ आपल्याला दिसले. पण कधी कोणत्या देशाच्या प्रमुखाचा असा काही व्हिडिओ आल्याचं ऐकिवात नाही. पण आता तसा एक व्हिडिओ आला आहे आणि तोही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा आहे! या व्हिडिओमध्ये व्लादिमीर पुतीन यांनी आइस हॉकीमध्ये तब्बल ८ गोल केले आणि ते चक्क तोंडावर पडले. चक्का रशियाचे राष्ट्राध्यक्षच तोंडावर पडल्यामुळे आसपासच्या खेळाडूंना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना काय करावं तेच समजलं नाही. मात्र, अखेर पुतीन स्वत:च उठून उभे राहिले आणि अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

नक्की काय झालं तेव्हा?

त्याचं झालं असं की रशियामध्ये राष्ट्राध्यक्षांनी दरवर्षी एका विशिष्ट मॅचमध्ये आइस हॉकी खेळण्याची पद्धतच आहे. स्वत: पुतीन सलग सातव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून या मॅचमध्ये खेळत होते. रशिया सरकारमधले काही मंत्री, उच्चपदस्थ, बिजनेस टायकून आणि इतर व्हीआयपी यांच्या टीमची काही नवोदित आणि शिकाऊ खेळाडूंच्या टीमसोबत एक्झिबिशन मॅच होती. यामध्ये पुतीन यांच्यासोबत रशियाचे काही नावाजलेले हॉकी खेळाडू देखील होते. रशियातल्या सोशी बोलशे आईस डोममध्ये ही मॅच झाली. पुतीन मैदानावर येताच दोनच मिनिटांमध्ये त्यांनी पहिला गोल केला. त्यानंतर प्रेक्षकांचे आभार मानताना त्यांनी मैदानात राऊंड मारायला सुरुवात केली. मात्र, प्रेक्षकांकडे पाहात कडेने जात असताना समोर रबराचा पृष्ठभाग असलेला पॅच आल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही. पायात आइस स्केटर्स असल्यामुळे त्या पृष्ठभागाला अडकून ते थेट तोंडावर पडले. सुदैवाने त्यांचा वेग कमी असल्यामुळे त्यांना इजा झाली नाही. इतकंच नाही, तर यानंतरही खेळ सुरूच ठेवत त्यांनी तब्बल ८ गोल केले!


हेही वाचा – अजब! सिंगल मुलींना बॉयफ्रेंड शोधण्यासाठी ८ दिवसांची सरकारी सुट्टी

पुतीन पडले तो व्हिडिओ!

- Advertisement -

२०११मध्ये पहिल्यांदा पुतीन यांनीच या प्रकारचा सामना खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंत ते या सामन्यांमध्ये खेळतात. आत्तापर्यंत त्यांनी या मॅचमध्ये ३६ गोल केले आहेत. स्पर्धेतल्या कोणत्याही खेळाडूपेक्षा त्यांनी केलेले गोल सर्वाधिक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -