घरदेश-विदेशबुरखा घालून मतदान करण्यावर भाजप खासदाराचा आक्षेप

बुरखा घालून मतदान करण्यावर भाजप खासदाराचा आक्षेप

Subscribe

बुरखा घालून बोगस मतदान होऊ शकतं. अशी भिती मुझफ्फरनगरचे भाजप खासदार संजीव बालियान यांनी व्यक्त केली.

बुरख्याआडून बोगस मतदान होते. त्यामुळे बुरखा घालून येणाऱ्या महिलांचे चेहरे तपासा अन्यथा फेरमतदानाची मागणी करेन असा इशारा मुझफ्फरनगरचे भाजप खासदार संजीव बालियान यांनी दिला आहे. आजपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्पयाला सुरूवात झाली. १७ व्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी देशभरात ९१ जागांवर आज मतदान होत आहे. यावेळी ते बोलत होते.

पश्चिम उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील आहे. लोकसभेच्या ८ जागांसाठीही आज मतदान होत आहे. या मतदाकसंघात मोठ्याप्रमाणावर अल्पसंख्यांक मतदार आहेत. तसेच येथे मुस्लिम महिला मोठ्या संख्येने येथे आहेत. त्यामुळे येथे मतदान करण्यास मुस्लिम महिला बुरखा घालून मतदान करण्यास येतात. बुरखा घातल्यामुळे त्यांच्या ओळखपत्रावरील फोंटोंसोबत शहानिशा करता येत नाही. यामुळे बुरखा घालून बोगस मतदान होऊ शकतं. अशी भिती मुझफ्फरनगरचे भाजप खासदार संजीव बालियान यांनी व्यक्त केली. तर बुरखा घालून येणाऱ्या महिलांची तपासणी झाली नाही तर फेरनिवडणूकीची मागणी करीन असेही ते म्हणाले.

- Advertisement -

तबस्सूम हसन म्हणतात…

बुरख्यातील महिलांनी कधीच चेहऱ्याची तपासणी करायला नकार दिला नाही. त्यामुळे बालियान यांच्या आरोपांना काहीच अर्थ नाही अशी टीका कैरानाहून महागठबंधनच्या उमेदवार असलेल्या तबस्सूम हसन यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -