घरदेश-विदेश'तुम्हाला पायाची वेदना जाणवते पण हत्या झालेल्या भाजपाच्या १३० कार्यकर्त्यांच्या मातांची नाही'

‘तुम्हाला पायाची वेदना जाणवते पण हत्या झालेल्या भाजपाच्या १३० कार्यकर्त्यांच्या मातांची नाही’

Subscribe

अमित शाह यांची ममता बॅनर्जी यांच्या पायाच्या दुखापतीवरुन टीका

केंद्रीय गृहमंत्री पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारासाठी आसाम आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. रानीबंदमधील जनतेशी संवाद साधताना शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर दुखापतीवरुन टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी पहिल्यांदाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये झालेल्या पायाच्या दुखापतीबद्दल एक विधान केले आहे. बांकुरा येथे जाहीर सभेदरम्यान जनतेला संबोधित करताना शहा म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना पायाला झालेल्या दुखापतीने वेदना होत आहेत. राजकीय हिंसाचारात भाजपचे १३० कार्यकर्ते मारले गेले, तेव्हा ममतांना या मारले गेलेल्या कार्यकर्त्यांच्या आईची वेदना जाणवते का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितीत केला. दरम्यान अमित शहा असेही म्हणाले की, बंगालच्या जनतेला वाटले असावे की कम्युनिस्ट राजवटीचा अंत झाल्यानंतर तरी हिंसाचार कमी होईल पण टीएमसी त्यापलीकडे पोहोचली आहे, मात्र निवडणूक आयोगानेही हा अपघात असल्याचे म्हटले आहे. खरं काय आहे ते देव जाणतो. असे असले तरी तुम्ही लवकरच बरे व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो, असा टोलाही अमित शहा यांनी ममता बॅनर्जींना लगावला आहे.

तुम्हाला तुमच्या पायाची चिंता पण…

रानीबंदमधील मतदारांशी संवाद साधतांना अमित शहा म्हणाले, ममताजींच्या पायाला दुखापत झाली मात्र ती कशी झाली हे माहित नाही. तृणमूल काँग्रेस यामागे कारस्थान असल्याची चर्चा आहे. मात्र निवडणूक आयोगाने हा अपघात असल्याचे म्हटले आहे. दीदी तुम्ही सध्या व्हिलचेअरवर फिरताय. तुम्हाला तुमच्या पायाची चिंता आहे. मात्र तुम्हाला हत्या झालेल्या भाजपाच्या १३० कार्यकर्त्यांच्या मातांना होत असणाऱ्या दु:खाबद्दल काहीच कसं वाटलं नाही,” असा टोलाही शाह यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून ममताजींना लगावला आहे.

- Advertisement -

असे सरकार सर्व सामान्यांच्या काय कामाचं?

व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या झारग्राम येथील जनतेला संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले, १० वर्षांपासून बंगालमध्ये TMC सरकार असून बंगालचा विकास करण्यास ते असमर्थ ठरलं प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार, टोलेबाजी, राजकीय हिंसाचार, घुसखोरी असल्याने बंगालचा विकास झालाच नाही. हिंदूंना, आदिवासींना त्यांचे सण साजरे करण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागतेय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मोदी सरकारने मागील १० वर्षांमध्ये दीदींची सत्ता असताना ११५ हून अधिक केंद्रीय योजना आदिवासी आणि इतर गरजूंसाठी राज्य सरकारपर्यंत पोहचवल्या. मात्र या योजना तुमच्या पर्यंत पोहचल्या नाहीत. असे सरकार सर्व सामान्यांच्या काय कामाचं आहे?,” असा सवालही शाह यांनी उपस्थित केला.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -