Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Bengal Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपला रसगुल्ला मिळेल; अमित शहांच्या दाव्याला ममतांचं...

Bengal Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपला रसगुल्ला मिळेल; अमित शहांच्या दाव्याला ममतांचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानानाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत पहिल्या टप्प्यातील ३० पैकी २६ जागांवर विजय मिळेल असा दावा केला. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. २६ जागा कशाला ३० च्या ३० जागा मिळतील असंच बोलायला हवं होतं, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.

अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत बंगालमध्ये २०० जागा जिंकून भाजप सरकार स्थान करेल, असा दावा केला आहे. बंगालमधील पहिल्या टप्प्यातील ३० जागांपैकी २६ जागा भाजप जिंकेल, असं अमित शहा म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये तुम्हाला रसगुल्ला मिळेल रसगुल्ला, असा जोरदार तिला लगावला. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान १ एप्रिलला होणार आहे.

- Advertisement -

बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता १ एप्रिल रोजी दुसर्‍या टप्प्यातील मतदान होण्याची तयारी सुरू आहे. दुसर्‍या टप्प्यातील सर्वाधिक महत्त्वाची जागा मानल्या जाणार्‍या नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमधील सुवेंदू अधिकारी समोरासमोर आहेत. नंदीग्रामची लढाई जिंकण्यासाठी ममता यांना कसलाही कसर सोडण्याची इच्छा नाही आहे. त्या रविवारीच नंदीग्राम येथे पोहोचल्या आहेत. पुढील तीन दिवस त्यांच्या नंदीग्राममध्ये प्रचारसभा आणि रोड शो होणार आहेत. रविवारी चडीपुर येथे निवडणूक जाहीर सभांना संबोधित करताना ममतांनी स्वतः सांगितले की मी १ एप्रिल मतदान होईपर्यंत नंदीग्राममध्येच राहीन. मतदानानंतर येथून जाईल.

- Advertisement -