घरदेश-विदेशपश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, गोळाबारात पाच जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, गोळाबारात पाच जणांचा मृत्यू

Subscribe

तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुक २०२१ मधील चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मात्र या मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण अधिक तापले आहे. पंतप्रधान मोदींकडूनही या घटनेचा निषेध केला जात आहे.

कूचबेहारमध्ये सीतलकुची भागामध्ये हा प्रकार घडला आहे. मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या आंनद बर्मन मतदारावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात आनंदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सितालकुचीमध्येही १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरही झालेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगूनही जमाव ऐकत नसल्याने सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराच्या घटनेमुळे मतदान केंद्रावरील मतदान थांबवण्यात आले आहे.

- Advertisement -

पहिली घटना सीतालकु भागातही एका मतदान  केंद्रातील 

पश्चिम बंगालमध्ये ४४ जागांवर सकाळपासून मतदान सुरु होते. दरम्यान सीतालकु भागातही एका मतदान केंद्रावर मतदान सुरु होते. यावेळी मतदानासाठी रांगेत उभ्या असेलल्या आनंद बर्मन या युवकावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या घटनास्थळी दाखल होत राडा घातला. यावेळी मतदान केंद्रावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. आनंद भाजपाच्या कार्यकर्ता असल्याने त्याची हत्या तृणमूल काँग्रेसने केली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

- Advertisement -

दुसरी घटना सीतालकुमधीलच १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील

सीतालकु भागातील घटनेनंतर सीतालकुमधीलच १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा तृणमूल आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगूनही जमाव ऐकत नव्हता. यावेळी जमावातील काही लोकांनी केंद्रीय सुरक्षा पथकातील जमावानांची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे नाईलाजाने सुरक्षा रक्षकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी गोळीबार केला. या गोळीबारात ४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -