घरताज्या घडामोडी२०२५च्या कुंभमेळ्याबाबत पर्यटन मंत्रालयाने दिले 'हे' उत्तर, यंदाची तयारी काय?

२०२५च्या कुंभमेळ्याबाबत पर्यटन मंत्रालयाने दिले ‘हे’ उत्तर, यंदाची तयारी काय?

Subscribe

प्रयागराजच्या संगम शहरात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात फुलपूरच्या खासदार केशरी देवी पटेल यांनी सोमवारी लोकसभेत सरकारला विचारले की, उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील संगम शहरात आगामी कुंभमेळ्याच्या तयारीचा तपशील काय आहे? एका लेखी प्रश्नात पटेल यांनी विचारले की, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रस्तावित सुविधांची यादी काय आहे आणि त्यासाठी किती रक्कम खर्च होण्याची शक्यता आहे?

केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रयागराजच्या संगम शहरात आगामी कुंभमेळा २०२५च्या यशस्वी आयोजनासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. १०० वर्षे जुना कर्झन पूल नदीचे संग्रहालय म्हणून विकसित केला जाईल आणि वारशाचे महत्त्व दर्शविण्यासाठी डिजीटल कुंभ संग्रहालय तयार केले जाईल, असं केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले. विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये उत्तर प्रदेश दाखवणे आणि विविध महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची ओळख आणि सुशोभीकरण करणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक सुविधा

केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक सुविधांसह तात्पुरत्या तंबूंची स्थापना, तसेच तात्पुरती तंबू वसाहत देखील स्थापन केली जाईल. तसेच तात्पुरती पर्यटन केंद्रे स्थापन करून पर्यटनस्थळी टुरिस्ट वॉकचे आयोजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कुंभमेळ्यासाठी पर्यटन प्रदर्शनाचे आयोजन

रोड शो, ट्रॅव्हल रोड शोच्या माध्यमातून त्याच वेबसाइट आणि डिजिटल सोशल मीडियाचा प्रचार केला जाईल. त्याचबरोबर कुंभमेळ्यासाठी पर्यटन प्रदर्शनाचे आयोजन आणि पर्यटकांना मदत करण्यासाठी एलईडी स्क्रीन आणि एलईडी व्हॅनद्वारे रेट्रो-रिफ्लेक्टीव्ह साइनेजची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. याच पर्यटकांसाठी हेली जॉय राईड चालवली जाणार असून बोट क्लब ते किल्ल्यापर्यंत साहसी खेळ चालवले जाणार आहेत.


हेही वाचा : 8 लाखांचे बक्षीस असलेल्या कुख्यात कमांडरचा खात्मा; गेल्या 13 वर्षांपासून नक्षल्यांमध्ये सक्रिय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -