घरताज्या घडामोडीCorona Vaccine: चीनच्या Sinopharm लसीला आपात्कालीन वापरासाठी WHOने दिली मंजूरी

Corona Vaccine: चीनच्या Sinopharm लसीला आपात्कालीन वापरासाठी WHOने दिली मंजूरी

Subscribe

चीनची औषध निर्माता कंपनी सिनोफार्मने विकसित केलेल्या कोरोना लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपात्कालीन वापरासाठी मान्यता शुक्रवारी दिली आहे. त्यामुळे आता संयुक्त राष्ट्र समर्थित कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाअंतर्गत गरजू देशांपर्यंत कोट्यावधी डोस पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल एडव्हायझरी ग्रुपच्या या निर्णयानंतर येत्या आठवड्यात किंवा महिन्यात चीनमध्ये तयार केलेल्या सिनोफार्म लसीचा समावेश संयुक्त राष्ट्र समर्थित लसीकरण कार्यक्रमात केला जाऊ शकतो. युनिसेफ आणि अमेरिकन स्थित जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयांतून वितरित केले जाऊ शकते.

- Advertisement -

चीनच्या लसीला मान्यता मिळण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने आपात्कालीन परिस्थितीत चीनच्या लसीला मान्यता द्यायची की नाही हा निर्णय घेण्यासाठी एक मोठी समिती गठीत केली होती. याबाबतची माहिती डब्यूएचओच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. पण आता लसीला मान्यता मिळल्यामुळे संयुक्त राष्ट्र समर्थित कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो डोस गरजू देशांपर्यत पोहोचवण्याचा मार्ग सुलभ होईल. येत्या आठवड्यात किंवा महिन्यांत तांत्रिक सल्लागार गटाच्या पुनरावलोकनातून संयुक्त राष्ट्र समर्थित लसीकरण कार्यक्रमामध्ये सिनोफार्म लसींचा समावेश होण्याची शक्यता निश्चित केली जाईल. अमेरिकेच्या प्रादेशिक कार्यालयद्वारे आणि मुलांसाठी संयुक्त राष्ट्र संघटनाची एजेंसी यूनिसेफच्या माध्यमातून वितरित केले जाईल. डब्यूएचओचे प्रवक्ते ख्रिश्चन लिंडमिअर म्हणाले की, पुढील शुक्रवारपर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे.


हेही वाचा – sputnik light ला केंद्र सरकारकडून आपात्कालीन वापरासाठी मंजूरी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -