घरदेश-विदेशका राहिले वाजपेयी अविवाहित?

का राहिले वाजपेयी अविवाहित?

Subscribe

अटल बिहारी वाजपेयी यांनी आयुष्यभर देशाची सेवा केली. देशाची निस्वार्थ सेवा करण्याच्या उद्देशानेच त्यांनी कधी लग्न नाही केले, असे अलट बिहारी वाजपेयी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले होते.

अटल बिहारी वाजपेयी यांनी लग्न केले नाही हे सर्वांना माहिती आहे. पण ते आयुष्यभर अविवाहित का राहिले याचे कारण तर कोणालाच माहिती नाही. आपल्या देशात अनेक महान नेते आहेत ज्यांनी लग्न केले नाही. त्यामध्ये ए पी जे अब्दुल कलाम यांचे नावे देखील समोर येते.

देशसेवेसाठी आयुष्य केले समर्पित

स्वार्थी भावनांना दूर ठेऊन अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य निस्वार्थ देशसेवेसाठी झोकून दिले. जनतेच्या सेवेसाठी त्यांनी स्वत:चे आयुष्य समर्पित केले. जीवनात आलेल्या प्रत्येक आव्हानांचा स्विकार करत त्यांना प्रत्युत्तर देण्यात तरबेज असलेल्या अटलजींनी जगाला आपली ताकद दाखवून दिली. १९९८ साली झालेल्या पोखरण अणुचाचणी दरम्यान अटलजींनी अमेरिकेसारख्या ताकदवान देशाला आपल्या देशाचं सामर्थ्य दाखवून दिले. तंत्रज्ञानाच्या ताकदीवर अटलजींनी प्रथमच अणु चाचणीचे प्रात्यक्षिक यशस्वी करुन जगामध्ये भारताची वेगळी ओळख प्रस्तापित केली.

- Advertisement -

यामुळे नाही केलं लग्न

देशाची निस्वार्थ सेवा करण्याच्या उद्देशानेच त्यांनी कधी लग्न नाही केले. त्यामुळे ते आयुष्यभर अविवाहित राहिले, असे वाजयपेयी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे सांगितले होते. राजकारणात पाऊल टाकल्यानंतर ते नेहमी प्रगतशील मार्गाने चालत राहिले. १९९६ ला जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या पक्षाचे सरकार बनले तेव्हा एका मताने त्यांचे सरकार पडले. मात्र १३ दिवस चाललेले सरकार पडल्यानंतर देखील वाजपेयी यांनी हार मानली नाही. सरकार स्थापनेचा पण केलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी काही दिवसांतच म्हणजे १९९६ ला सरकार स्थापन करुन देशाचे पंतप्रधान झाले.

देशातील जनतेला द्यायचे महत्त्व

अटल बिहारी वाजपेयी यांनी आपले संपूर्ण आयुष्य राजकारणासाठी झोकून दिले. नेहमी ते विचारांना महत्व द्यायचे. पण त्यांच्या मते, राजकारणात आपण फक्त स्वत:च्या विचारांनाच महत्त्व देऊ शकत नाही. कारण तुम्हाला सर्व जनतेचे म्हणणे ऐकावे लागते. राजकारणात देशातील जनता महत्त्वाची असते. ज्या जनतेने तुम्हाला इथपर्यंत आणून पोहोचवले आहे त्याच जनतेचे म्हणणे तुम्ही ऐकले नाही तर राजकारणाच्या या खेळातून तुम्ही बाहेर पडू शकता, असे वाजपेयी यांचे मत होते.

- Advertisement -

करिअरची सुरुवात पत्रकारितेपासून

जीवनात नेहमी संघर्ष करणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या करिअरची सुरुवात पत्रकारितेपासून केली. तिथूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा पाया घातला. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताकडून पहिल्यांदा हिंदीमध्ये भाषण देऊन अटलजींनी जगापुढे देशाचा सन्मान वाढवला.

उत्तरप्रदेशशी जिव्हाळा

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये २५ डिसेंबर १९२४ ला झाला होता. त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी शिक्षक होते. अटलजींचा जन्म जरी मध्यप्रदेशमध्ये झाला असला तरी त्यांचा जास्त जिव्हाळा उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊशी होता. लखनऊ येथूनच ते खासदार झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -