अथिया, डु यू लव्ह मी?

काही दिवसांपूर्वी अथिया लंडनला एका पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी अथिया ड्रेकला भेटली. त्यावेळी त्यांच्यात चांगली मैत्री झाली. आणि आता त्यांच्यातील प्रेमाची चर्चा रंगू लागली आहे

(फोटो सौजन्य- द ट्रिब्युनल एक्सप्रेस)

ड्रेकच्या ‘किकी’ च्या गाण्याने संपूर्ण जगाला वेड लागले. पण खऱ्या आयुष्यात ड्रेक मात्र ‘अथिया’च्या प्रेमात आहे. वाचून एकदम धक्काच बसला असेल ना? पण ड्रेक आणि अथियाच्या प्रेमाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहेत. विदेसी छोरा या हिरोईनसोबत कसा? असाही प्रश्न पडला असेल तर ही बातमी नक्कीच वाचा. म्हणजे किकीच्या या खऱ्याखुऱ्या लव्हस्टोरीबद्दल तुम्हाला अधिक कळेल.

नेमकं काय झालं इन्स्टाग्रामवर?

इन्स्टाग्रामवर हल्ली सगळेच सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असतात. सुनील शेट्टीच्या वाढदिवसादिवशी अथियाने तिने सुनील शेट्टी आणि तिचा लहानपटीचा फोटो पोस्ट करत सुनीलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या पोस्टवर ड्रेकने ‘legend’ अशी कमेंट लिहिली. त्यावर मग अथियाने देखील कमेंट दिली. पण यात वावग काय असे वाटेल. पण या सगळ्यात उडी घेतली ती वरुण धवनने त्याने ‘तूच किकी होती हे माहित नव्हतं’, अशी कमेंट करुन ‘डाल मे कुछ काला है’,असे काही संकेत दिले. तर ड्रेकने सुद्धा त्यावर कमेंट पोस्ट केली.

instagram_athiya
अथिया शेट्टी यानी ही पोस्ट टाकल्यानंतर झालेले संभाषण( सौजन्य-अथिया इन्स्टाग्रामवर)
athiya_instagarm
वरुण धवनने अथियाला विचारलेला प्रश्न (सौजन्य- इन्स्टाग्राम)

अथिया भेटली ड्रेकला?

काही दिवसांपूर्वी अथिया लंडनला एका पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी अथिया ड्रेकला भेटली. त्यावेळी त्यांच्यात चांगली मैत्री झाली.अथिया आणि ड्रेक संपर्कात असून अथिया त्याला भेटण्यासाठी लंडनला जाते असे देखील समोर आले आहे. हे दोघं लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. आता या प्रेमाची कबुली हे दोघं देणार की, ही फक्त अफवा हे येत्या काळात नक्कीच कळेल.