Spanish Flu vs Covid-19 : कोरोनामुक्तीनंतर उपचार का लांबतोय? संशोधन सांगते…

१९१८ च्या स्पॅनिश फ्लू पेक्षाही कोरोना महामारी भयंकर

spanish vs covid-19

कोरोनावर उपचार घेतल्यानंतरही अनेक महिने रूग्णांवर उपचार करावे लागतात. पण कोरोनामुक्तीनंतरही उपचार करण्याची प्रक्रिया अतिषय क्लिष्ट असून रूग्णांनाही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा व्हायरस यासाठी मुख्य कारण असून त्यामुळेच कोरोनावर उपचार देणे डॉक्टरांसाठीही एक प्रकारचे आव्हान बनले आहे. पण कोरोनावर उपचार करणे कठीण का आहे ? याचे उत्तर आता संशोधनातून समोर आले आहे. तसेच कोरोनाचा विषाणू हा अतिशय संसर्गजन्य नेमके कारणही संशोधकांनी शोधून काढले आहे. अनेक रूग्णांचा कोरोनावर दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात, याचेही नेमके कारण या संशोधनातून समोर आले आहे.

आयर्लंडच्या डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजच्या संशोधकांनी कोरोना व्हारसची विशिष्ट अशी संक्रमण पसरवणारी रचना का आहे ? याबाबतचा अभ्यास संशोधकांनी केला. तसेच या अभ्यासामधून कोरोनातून उपचार घेऊन बरे होण्यासाठी अनेक रूग्णांना वेळ का लागतो ? यावरही संशोधकांनी प्रकाश टाकला आहे. अनेक रूग्ण हे कोरोनाचा संगर्ग झाल्यानंतर महिनोमहिने का उपचार घेतात ? कोरोनातून मुक्ती मिळवल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग का राहतो ? अशा अनेक प्रश्नांची उकल या संशोधनातून झाली आहे. तसेच अनेक रूग्णांना कोरोनावर उपचार घेताना येणाऱ्या अडथळ्यांवरही संशोधनातून माहिती समोर आली आहे.

कोरोना शरीरावर कसा परिणाम करतो ?

अनेक रूग्णांच्या निमित्ताने एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे श्वसन यंत्रणेत वरच्या आणि खालच्या बाजुला अशा दोन्ही ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचा परिणाम होतो. श्वसन यंत्रणेत खालच्या बाजुला लो पॅथोजेनिकमुळे खोकल्यासारखी लक्षणे समोर येतात. तर वरच्या बाजुच्या श्वसन यंत्रणेतील भागामुळे SARS, ADRS यासारख्या संसर्गाचा धोका वाढतो. परिणामी कोरोनाचे संक्रमण श्वसन नलिकेत खालच्या दिशेला अधिक हानीकारक ठरते. परिणामी शऱीरातील अनेक अवयवांवर हा कोरोनाचा विषाणू संक्रमणासाठी कारणीभूत ठरतो. त्यामध्ये प्रामुख्याने रक्ताच्या गुठळ्या होणे तसेच रोग प्रतिकारक शक्तीवर परिणाम होणे यासारख्या गोष्टी कारणीभूत ठरतात. इतर विषाणूपेक्षा म्हणूनच कोरोनाचा विषाणू हा वेगळा आहे. इतर विषाणूंवर रोग प्रतिकारक शक्तीच्या माध्यमातून मात करणे शक्य होते. पण या व्हायरसमध्ये मात्र मुख्यत्वेकरून रोग प्रतिकारक शक्तीवरच परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या निमित्ताने झालेल्या प्राणी आणि प्रयोगांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती महत्वाची आढळली आहे. प्राण्यांच्या बाबतीत ही रोग प्रतिकारक शक्ती वेगळ्या पद्धतीने काम करते. तर दुसरीकडे मानवांमध्ये आढळणारी रोग प्रतिकारक शक्ती वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देते. अनेक रूग्णांच्या बाबतीत रोग प्रतिकारक शक्तीवरच परिणाम झाल्याने त्याचा परिणाम हा संपुर्ण शरीरावर आढळला आहे. संपुर्ण शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीवर मर्यादा आल्याने शरीरातील संपुर्ण भागात वेगवेगळ्या अवयवांचे नियोजन ढासळत असल्याचे त्यानिमित्ताने समोर आले आहे. परिणाम कोरोनाच्या संक्रमणाला प्रतिसाद देण्यासाठीचाही परिणाम आढळून आला आहे.

कोरोनावर रुग्णांना दीर्घकाळ का उपचार घ्यावा लागतोय ?

कोरोनावर उपचार घेताना काही लोकांना उपचारासाठी अधिक वेळ का लागतो आहे ? याचे कारण शोधण्याचा अभ्यास या निमित्ताने करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने कोरोनावर दीर्घकालीन उपचार घेण्यासाठीचे एक मुख्य कारण समोर आले ते म्हणजे कोरोनाच्या संसर्गानंतर मोठ्या प्रमाणात फुफ्फुस डॅमेज होणे होय.

१९१८ स्पॅनिश फ्लू पेक्षाही कोरोना महामारी भयंकर

डब्लिनच्या ट्रिनीटी कॉलेजमध्ये क्लिनिकल विषयातील प्राध्यापक असलेले इग्नॅशिओ मार्टीन लोचेस यांनीही या संशोधनाच्या निमित्ताने काही मत मांडले आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये SARS-CoV-2 मुळे श्वसनाचा गंभीर स्वरूपाचा अडथळा निर्माण होणे हे मुख्य लक्षण आढळले आहे. याआधीच्या १९१८ च्या स्पॅनिश फ्लू महामारीमध्ये अशा प्रकारची आरोग्याचे आरोग्याचे संकट आढळले नव्हते. पण आताच्या कोरोनाच्या महामारीमुळे लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

कोरोनाच्या संशोधनासाठी संपुर्ण जगभरातील संशोधकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. पण या संशोधनामध्ये आपण अगदी सुरूवातीच्या टप्प्यात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. म्हणून संसर्गाच्या आजारांमध्ये कोरोनाचा विषाणू हा अतिशय वेगळा ठरलेला आहे. म्हणूनच कोरोनाच्या विषाणूवर स्वतंत्र असा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. याआधी कधीच न आढळलेला संसर्ग म्हणून त्याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या विषाणूची अगदी वेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. तसेच या विषाणूची पॅथोफिजिओलॉजीही अतिशय़ भिन्न अशी आहे. म्हणूनच आपल्याला या संसर्गावर उपचार देताना अतिशय काळजीपूर्वक आणि माहितीपूर्ण असा उपचार देण्याची गरज आहे.

पण या माहितीपूर्ण अशा उपचाराचा अर्थ असा होत नाही, की आपण सध्याच्या सुरू केलेल्या आदर्श उपचार पद्धती बंद करणे. सध्याच्या उपचारांमध्ये सुरू असलेल्या सर्वोत्तम अशा उपचार पद्धतींचा वापर करणे तितकेच गरजेचे आहे. सध्याच्या लिंग, वय, वंश आणि आधीच्या सहव्याआधींच्या आधारावरच आता उपचाराच्या गाईडलाईन्स निश्चित होणे गरजेचे आहे. त्यासोबतच कोरोना रूग्णांना सर्वाधिक गरजेचा आणि वेळीच उपचार देणेही आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.