घरक्रीडाIPL 2021 : CSK चा बॅटिंग कोच मायकल हसी कोरोनामुक्त; मात्र क्वारंटाईनच राहणार

IPL 2021 : CSK चा बॅटिंग कोच मायकल हसी कोरोनामुक्त; मात्र क्वारंटाईनच राहणार

Subscribe

हसीचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यास तो मालदीवला जाऊ शकणार आहे.

आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. परंतु, आता त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, असे असले तरी हसी आणखी काही काळ चेन्नईतील हॉटेलात क्वारंटाईन राहणार असल्याचे चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले. यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित केल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवला रवाना झाले. मात्र, हसीला भारतातच थांबावे लागले. परंतु, आता त्याचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यास तो मालदीवला जाऊ शकणार आहे.

हसी पूर्णपणे ठीक

हसी आणि चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीला गुरुवारी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीहून चेन्नईत आणले होते. मात्र, त्याआधीच हसीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आता तो पूर्णपणे ठीक आहे. आमचे सर्व परदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य त्यांच्या मायदेशी परतले आहेत. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आज रवाना झाले. हसी मात्र क्वारंटाईन राहणार आहे, असेकाशी विश्वनाथन म्हणाले.

- Advertisement -

चेन्नई संघाचा आभारी

तसेच चेन्नई संघाचे व्यवस्थापन खूप काळजी घेत असल्याबद्दल हसीने त्यांचे आभार मानले. मला आता ठीक वाटत आहे. मी विश्रांती घेत आहे. मी चेन्नई संघाचा खूप आभारी आहे. ते माझी खूप काळजी घेत आहेत. भारतात कोरोनाची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. मात्र, या काळातही मला चेन्नईचा संघ पूर्ण साथ देत आहे. मी खूप भाग्यवान आहे, असे हसी एका मुलाखतीत म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -