घरताज्या घडामोडीधक्कादायक! कर्नाटकमध्ये मेट्रोचा पिलर कोसळून मायलेकाचा मृत्यू

धक्कादायक! कर्नाटकमध्ये मेट्रोचा पिलर कोसळून मायलेकाचा मृत्यू

Subscribe

कर्नाटकमध्ये मेट्रोचा पिलर कोसळून मायलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. बंगळुरूमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला आणि एका महिलेसह तिच्या तीन वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत मृत महिलेचा पती आणि तिची मुलगी गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

बंगळुरूच्या नागावारा या परिसरात मेट्रोच्या पिलरचे बांधकाम सुरू आहे. परंतु बांधकाम सुरू असताना हे कुटुंब तिथून बाइकनं चाललं होतं. मात्र, दुर्दैवाने त्याच वेळी पिलर कोसळला. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तेजस्विनी नामक असं त्या महिलेचं नाव आहे. तसेच मृत महिलेचा पती आणि मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काँग्रेसची टीका

- Advertisement -

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, बंगळुरूमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला. हा ‘40% कमिशन’ सरकारचा निकाल आहे. विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारची गुणवत्ता नाही. नागरिकांचा या सरकारवरील विश्वास उडत चालला आहे. सर्वत्र भ्रष्टाचार होत आहे, अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्षांनी केली आहे.


हेही वाचा : पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -