घरदेश-विदेशनक्षलवाद्यांशी दोन हात करणारी आठ महिन्यांची गर्भवती कमांडो

नक्षलवाद्यांशी दोन हात करणारी आठ महिन्यांची गर्भवती कमांडो

Subscribe

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या 'डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड' मध्ये 'दंतेश्वरी फायटर' म्हणून सुनैना पटेल कार्यरत आहेत.

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्हा हे नक्षलवाद्यांचे नंदनवन मानले जाते. या जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव जास्त असल्याने इथे कार्यरत असलेल्या जवानांना सतत जीवाचा धोका असतो. मात्र अशा परिस्थितीतही नक्षलवाद्यांना आव्हान देतेय ती एक आठ महिन्यांची गर्भवती कमांडो. ‘सुनैना पटेल’ असं या महिला कमांडोचे नाव असून त्या आठ महिन्यांच्या गरोदर असूनही आपल्या ड्युटीवरून मागे हटण्यास तयार नाहीत. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या ‘डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड’ मध्ये ‘दंतेश्वरी फायटर’ म्हणून सुनैना पटेल कार्यरत आहेत. पाठीवर ८ ते १० किलोंचे वजन, AK-47 यांसारखी आधुनिक हत्यारे त्यात आठ महिन्यांचा गर्भ आणि नक्षलप्रभावित भाग अशा कठीण परिस्थितीत सुनैना पटेल आपली ड्यूटी निभावत आहे. याअगोदर कर्तव्य बजावत असताना त्यांना गर्भपातालाही सामोरे जावे लागले आहे. मात्र तरीही त्या नक्षलवाद्यांविरोधात लढतच आहेत.

जेव्हा मी युनिटमध्ये रुजु झाले तेव्हा मी दोन महीन्यांची गरोदर होते. मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या. पण आता आठ महिन्यांची गरोदर असताना वरीष्ठ देतील ती जबाबदारी मी पार पाडेल.  

-सुनैना पटेल

महिला कमांडोंची संख्या झाली दुप्पट 

पूर्वी युनिटमध्ये महिला कमांडोंची संख्या फार कमी होती मात्र सुनैना पटेल यांनी कमांडर पद स्वीकारल्यापासून युनिटमध्ये महिला कमांडोंची संख्या दुप्पट झाली असल्याचे दंतेवाडाचे एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले. सुनैना यांच्या बाळाला गर्भातच संस्कार मिळत आहे. घनदाट जंगलात गस्त घालत असताना त्यांच्या पाठीवर बरेच ओझे आणि हातात रायफल असते. मात्र तरीही त्या आपल्या कर्तव्य बजावण्यास कुठेही कमी पडत नाही. आज जागतिक महिला दिनानिमित्त सुनैना पटेल यांची ही गोष्ट सर्वांना नक्कीच प्रेरणादायक ठरेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -