घरताज्या घडामोडीShocking! फाईल ओपन करताच आढळला साप, महिला तहसीलदाराची उडाली झोप

Shocking! फाईल ओपन करताच आढळला साप, महिला तहसीलदाराची उडाली झोप

Subscribe

काय आहे सापाची प्रजाती?

बैतूल – सापाचं नाव घेतल्यावर भल्या भल्यांची झोप उडते. एकदा साप जरी जवळ आला तरी मनाचा थरकाप उडतो. पण साप जर एकदम समोर आला तर काय होईल?…अशीच एक घटना मध्य प्रदेशातील बैतूल मध्ये घडली आहे. एका महिला तहसीलदाराच्या डेस्कसमोर एक फाईल ठेवली होती. परंतु ती फाईल ओपन करताच तिची तारांबळ उडाली. कारण फाईलमध्ये साप लपून बसला होता. परंतु जेव्हा तिने फाईलला उचललं तेव्हा सापाने आपला फना वर केला. सापाने फना वर करून अगदी महिला तहसीलदाराच्या समोर गेल्यामुळे अचानक ती किंचाळली. सापाची माहिती ऐकताच संपूर्ण विभागात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बैतुलच्या शाहपूर तहसील कार्यालयामध्ये अँटोनिया आपल्या ऑफिसमध्ये बसल्या होत्या. त्यांना एका गु्न्हा केलेल्या संदर्भातील फाईलची गरज होती. त्यांना डेस्कवर ठेवलेली फाईल जशी ओपन केली. तसा एक दीड फुटाचा साप बाहेर आला. त्यानंतर तहसीलदार साप, साप असं म्हणत किंचाळल्या. त्यामुळे संपूर्ण ऑफिसमध्ये तारांबळ उडाली.

- Advertisement -

तहसीलमध्ये एक कर्मचारी होता. त्या कर्मचाऱ्याने फाईलला उचललं आणि ऑफिसबाहेर घेऊन गेला. परंतु फाईल ओपन केली असता, त्यामध्ये साप आढळून आला. मी सावधानीपूर्वक फाईल ओपन केली होती. जर मी फाईल घाईघाईने ओपन केली असती, तर माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. असं तिने म्हटलं आहे.

काय आहे सापाची प्रजाती?

सापाची प्रजाती कॉडिला असल्याचं सांगितलं जात आहे. फाईलमध्ये सापडलेला सापची प्रजाती ही काळ्या आणि सफेद रंगाची आहे. त्यामुळे त्याला कॉडिला असं म्हटलं जातं. या प्रजातीला सायलेंट किलर असं म्हटलं जातं.
इंडियन क्रेट साप खूप विषारी असतात. तसेच हे साप भारतातील उपमहाद्विपमध्ये आढळले जातात.

- Advertisement -

हेही वाचा: St Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटीत शक्तीपुढे सरकार नमलं : गोपीचंद पडळकर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -