घरताज्या घडामोडीWorld Heart Day 2021 : मासिक पाळी लवकर बंद होण्याचे ह्दयविकाराशी कनेक्शन...

World Heart Day 2021 : मासिक पाळी लवकर बंद होण्याचे ह्दयविकाराशी कनेक्शन काय ?

Subscribe

एखाद्या महिलेच्या आयुष्यात आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी म्हणजे हार्मोनल बदलांशी संबंधित सर्वात जवळची गोष्ट. महिलेल्या शरीराची प्रजनन क्षमता या मासिक पाळीच्या माध्यमातून स्पष्ट होत असते. महिलेच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने या काळात ओव्हरीजच्या माध्यमातून ज्या हार्मोन्सची निर्मिती होती ती गोष्ट प्रजननाच्या अनुषंगानेही महत्वाची ठरते. वयोमानानुसार ओव्हरीजच्या माध्यमातून प्रजनन क्षमतेत घट होत जाते. हार्मोन्समध्ये अॅस्ट्रोजेन निर्मिती घटल्याचा परिणाम हा मासिक पाळीवर होत असतो. सतत बारा महिने पाळी न येणे म्हणजे नैसर्गिक मेनोपॉज असे मानण्यात येते.

महिलेच्या मेनोपॉजजचा कालावधीचे सरासरी वय हे ४५ ते ५५ वर्ष असे आहे. पण मेनोपॉज जर ४० ते ४५ वयातच सुरू झाला तर त्याला लवकर आलेला मेनोपॉज असे म्हटले जाते. तर ४० वर्षाच्या आधीच आलेल्या मेनोपॉजला प्रीमॅच्युअर मेनोपॉज असे संबोधले जाते. जेव्हा महिलेच्या आरोग्याशी संबंधित मेनोपॉजचा कालावधी सुरू होतो तेव्हा अनेक गोष्टी या त्या व्यक्तीशी संबंधित दिसून येतात. त्यामध्ये मूड चेंज, मानसिक तणाव, अतिरिक्त घाम येणे, शारिरीक बदल अशा अनेक गोष्टी घडतात.

- Advertisement -

महिलेल्या शरीरातील ओव्हरी काढून टाकणे किंवा लवकर पाळी बंद होणे याचा संबंध हा थेट ह्दयविकाराशी आहे. प्रजनन क्षमतेच्या कालावधीत महिलांना या सेक्स हार्मोन्सचे कवच असते. त्यामुळे ह्दयविकाराचा धोका कमी असतो. त्यामुळेच तरूण महिलांमध्ये ह्दयविकाराचे प्रमाण कमी असण्यासाठी महिलांची मासिक पाळी हीच जबाबदार असते.

अमेरिकन हार्ट रिसर्च असोसिएशनने नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालानुसार ज्या महिल्यांची मासिक पाळी ४० वर्षांच्या आतच बंद होते, अशा महिलांना ह्दयविकार होण्याची शक्यता अधिक असते. चाळीशीनंतरच्या महिलांच्या तुलनेत या महिला अधिक रिस्कवर असतात. मेनोपॉजचा संबंध हा कॉम्प्लेक्स हार्मोनल बदलांशी आहे. त्यामध्ये रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असणे, चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. शरीरातील फॅट्ससोबतही याचे कनेक्शन आहे. कमरेभोवती चरबी जमा होण्याचा संबंध हा थेट ह्दयविकाराशी आहे.

- Advertisement -

उपाययोजना काय ?

ज्या महिलांच्या कुटूंबीयांमध्ये ह्दयविकार आहे अशा महिलाही मेनोपॉजनंतर अधिक हाय रिस्कवर असतात. अशा महिलांना मेनोपॉजनंतर ह्दयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच मेनोपॉज लवकर येणाऱ्या महिलांनी वेळोवेळी शरीराची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये चांगल्या आरोग्याच्या सवयी, नियमित व्यायाम, चांगला आहार, नियमित रक्तदाब तपासणी करणे, कोलेस्ट्रॉल लेव्हलची चाचणी करणे, रक्तदाब तसेच शुगर नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यासोबतच दीर्घकालीन उपाय म्हणून स्मोकिंगही बंद करणे गरजेचे आहे.

हार्मोन रिप्लेसमेंट थिअरीचा उपयोग काय ?

हार्मोन (एस्ट्रोजेन) रिप्लेसमेंट थिअरीमुळे ह्दयविकाराचा धोका कमी होतो का ? हा सध्या वादाचा विषय आहे. त्यामुळे अशा शस्त्रक्रियांमुळे महिलांना ह्दयविकाराचा धोका टाळणे शक्य झाल्याचे अद्यापही सिद्ध झालेले नाही. तसेच मेनोपॉज कालावधीनंतर हॉट फ्लॅशेश हेच सध्याचे ह्दयविकारासाठीचे लक्षण आढळून आले आहे. ज्या महिला वर्षापोटी ह्दयविकाराशी संबंधित चाचण्या करतील असा महिलांना ह्दयविकाराचा धोका टाळता येईल, असे मत दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलच्या गायनॅकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ सुनिता वर्मा यांनी मांडले आहे.


हेही वाचा –


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -