घरदेश-विदेशजगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ५१ लाखांच्या वर; 'या' देशात वेगानं वाढताय रूग्ण!

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ५१ लाखांच्या वर; ‘या’ देशात वेगानं वाढताय रूग्ण!

Subscribe

संक्रमित १० देशांच्या यादीतून चीन हद्दपार झाला आहे. तर भारत पहिल्या दहा देशांमध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर आहे.

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत जगातील २१३ देशांमध्ये सुमारे १ लाख ५ हजार ७६६ नवीन कोरोना रूग्णांची नोंद केली गेली असून मृतांच्या संख्येत ४ हजार ८३३ रूग्णांची वाढ झाली आहे. nCoV2019.live ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५१ लाख ९७ हजार ७७६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3 लाख ३१ हजार ६७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २० लाख ८२ हजार ७१७ लोकं ही संसर्गमुक्त झाले आहेत.


Coronavirus: अमेरिकेत मृतांचा आकडा वाढला; ९६ हजारहून अधिक जणांचे बळी!

‘या’ देशात वेगानं वाढताय रूग्ण!

जगातील एकूण कोरोना रूग्णांपैकी एक तृतीयांश अमेरिकेत नोंद करण्यात आली आहेत आणि जवळजवळ एक तृतीयांश मृत्यू अमेरिकेतच झाले आहेत. दरम्यान, अमेरिकेव्यतिरिक्त रशिया आणि ब्राझीलमध्येही कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असून रूग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वाधिक कहर यूकेमध्ये झाला. जेथे एकूण २ लाख ५० हजार ९०८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ३६ हजार ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. रशिया, स्पेन आणि ब्राझीलच्या तुलनेत यूकेमध्ये रूग्णांची संख्या कमी आहे. यानंतर इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की, इराण, भारत यासारख्या देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा फटका बसल्याने परिणाम झाला आहे.

- Advertisement -
या १२ देशांमध्ये लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

रशिया, ब्राझील, स्पेन, यूके, इटली येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. याखेरीज असे सहा देश आहेत ज्यात एक लाखाहून अधिक कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहेत. अमेरिकेसह या १२ देशांमध्ये एकूण ३९ लाख कोरोनाबाधितांची संख्या आहे. अमेरिकेव्यतिरिक्त रशिया आणि ब्राझीलमध्येही कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. तसेच अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन या ५ देशात २५ हजाराहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. अमेरिकेत मृतांचा आकडा ९६ हजारांच्या पुढे गेला असून संक्रमित १० देशांच्या यादीतून चीन हद्दपार झाला आहे. तर भारत पहिल्या दहा देशांमध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -