घरदेश-विदेशयोगी आदित्यनाथांनी केला गोरखपुर दौरा,करोनाचा नाश करण्यासाठी गोरखपूर मंदिरात केलं रुद्राभिषेक

योगी आदित्यनाथांनी केला गोरखपुर दौरा,करोनाचा नाश करण्यासाठी गोरखपूर मंदिरात केलं रुद्राभिषेक

Subscribe

ICCC आणि लसीकरणाच्या कामाचे निरीक्षण करण्यात आले. आपण जिंकू! अश्या प्रकारचे ट्विट करत आणि सांवद साधत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण माहिती दिली.

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. लासीकरणाला वेग आला असला तरी लाखो कोरोनाबधितरुग्ण आपुर्‍या सोयी सुविधे अभावी दगावत आहेत. देशाची गंभीर स्थिती पाहता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतच गोरखपुरचा दौरा केला आणि या महाभयंकर महामारी पासून आपला देश कोरोनामुक्त व्हावा याकरिता योगींनी गोरखनाथ मंदिरामध्ये करोनाचा नाश करण्याकरिता तसेच  लोककल्याणासाठी रुद्राभिषेक केला. रुद्राभिषेकादरम्यान मुख्यमत्र्यांनी शंकराच्या वैदिक मंत्रांचे पठण केलं. तसेच ११ लीटर दुध आणि पाच लीटर पाण्याने अभिषेक केला. मुख्यमंत्र्यांनी रुद्राभिषेकाचा सुरुवात गणपतीच्या पुजेने केली. रुद्राभिषेकासाठी मंदिराचे मुख्य पुजारी रमानुज त्रिपाठीसुद्धा उपस्थित होते. त्यांच्या पुढाकारानेच हा रुद्राभिषेक करण्यात आला. रामानुज यांनी मंत्रोच्चार केला तर इतर तीन पुजाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं. तसेच या रुद्राभिषेकने कोरोना व्हायरसचं सावट दूर होईल असे पूजार्‍यांतर्फे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

पुजाविधी आटोपल्या नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी संपर्क साधत कोरोना व्हायरसला पराभूत करण्यासाठी राज्य सरकार बचाव कार्य आणि लसीकरणासाठी पूर्ण जोमाने प्रयत्न करीत आहे.आज गोरखपूर आणि अयोध्यामध्ये सुरू असलेल्या बचाव कार्यांचा आढावा घेण्यात आला. ICCC आणि लसीकरणाच्या कामाचे निरीक्षण करण्यात आले. आपण जिंकू! अश्या प्रकारचे ट्विट करत आणि सांवद साधत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण माहिती दिली.


हे हि वाचा – दिल्लीपासून गल्लीपर्यंत सामना वाचावाच लागतो अन् धोरणं बदलावीही लागतात; राऊतांचा नाना पटोलेंना टोला

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -