घरदेश-विदेशलिव्ह इन रिलेशनशिप प्रकाराबद्दल हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांचे धक्कादायक विधान

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकाराबद्दल हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांचे धक्कादायक विधान

Subscribe

मुंबई | “लिव्ह इन रिलेशनशिप (Live-In Relationship) कायद्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे”, असे विधान हरियाणा महिला आयोगाच्या (Haryana State Commission for Women) अध्यक्षा रेणू भाटिया यांनी केले आहे. हरियाणातील कैथल जिल्ह्यातील आरकेएसडी कॉलेजमध्ये कायदे आणि सायबर क्राइम या विषयावर जनजागृतीवर कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात रेणू भाटिया (Renu Bhatia) या प्रमुख अतिथी होत्या. “मुली ओयो हॉटेलमध्ये जाऊन हनुमानाची आरती करायला जात नाहीत ना? असा खोचक प्रश्न करून त्या म्हणाल्या, या मुलींनी लक्षात ठेवले पाहिजे की, तिथे मुलींसोबत कोणताही वाईट प्रसंग घडू शकतो”, असे विधानही रेणू भाटिया यांनी यावेळी केले आहे.

“सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बनविलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यामुळे महिलांशी संबंधित प्रकरणे सोडविताना आयोगाचे हात बांधले गेले आहेत. लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यात बदल करण्याची गरज आहे”, असे रेणू भाटिया यावेळी म्हणाल्या. “आतापर्यंत महिला आयोगाकडे जेवढी प्रकरणे आली आहेत, ती पाहता अशा प्रकरणामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे दिसते. तसेच लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यामुळेच गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणांमुळे दोन कुटुंबे तुटते. या पार्श्वभूमीमुळे कायद्यात बदल करण्याची गरज आहे”, अशी मागणीही रेणू भाटिया यांनी केली आहे.

ओयोच्या हॉटेलमध्ये वाईट प्रसंग होऊ शकतो
“मित्राने कोल्ड्रिंकमध्ये मिसळून काही तरी पाजले. यानंतर माझ्यासोबत वाईट कृत्य केले आणि त्याचा व्हिडीओ बनवला, अशा तक्रारी मुली करतात. तेव्हा मुलींना साधी गोष्ट माहिती नाही का? मुली ओयो हॉटेलमध्ये जाऊन हनुमानाची आरती तर करत नाही ना? मुलींनी त्या ठिकाणी जाताना लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्यासोबत कोणताही वाईट प्रसंग घडू शकतो, असा विचार त्यांनी करायला हवा” असे रेणू भाटियांनी म्हटले आहे.
रेणू भाटियांची कॉलेजमधील मुला-मुलींवर टीका
“जेव्हा मुला-मुली कॉलेजमध्ये जातात, तेव्हा त्यांना पंख फुटतात. कारण मुलं-मुलींना शाळेच्या गणवेशातून सुटका मिळालेली असते. आपण काहीही घालावे, आधुनिक पोशाख परिधान करावे, असे त्यांना वाटते. या मुलांना वाटते की, कॉलेजला गेल्यानंतर बाईक आणि गर्लफ्रेण्ड असेल आयुष्य असते”, अशा कठोर शब्दांत रेणू भाटियांनी कॉलेजच्या मुला-मुलींवर टीका केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -