घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाअमृता पवार यांनी 'वृक्षात' साकारला बाप्पा

अमृता पवार यांनी ‘वृक्षात’ साकारला बाप्पा

Subscribe

पिंपरी - चिंचवड येथील अमृता पवार यांनी झाडामध्ये बाप्पा साकारला आहे - वोट करा

पिंपरी – चिंचवड येथे अमृता पवार यांच्या घरी बाप्पा आला असून त्यांचा बाप्पा यंदा झाडामध्ये विराजमान झाला आहे. निसर्गाची हानी होऊ नये याकरता पवार कुटुंबियांनी निसर्ग देवतेचं चित्र साकारुन निसर्ग संवर्धनाचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. या कुटुंबियाने यंदा इको फ्रेंडली असा झाडामध्ये विराजमान झालेला देखावा तयार केला आहे.

eco friendly bappa contest : amruta pawar Environmental awareness decorationज्या पुस्तकांच्यामुळे आपली बुद्धी तल्लख होत गेली, ज्ञान वाढलं आणि आपल्याला माणूसपण लाभलं याचं प्रतिक म्हणून अमृता पवार यांनी एक मोठा ग्रंथ साकारला आहे. त्यावर जी नावं आणि अक्षरं कोरली आहेत ती म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून अमृता यांच्या ‘थिएटर वर्कशॉप कंपनी’ च्या माध्यमातून अनेक एकांकिका, बालनाट्य, दिर्घांक आणि नाटकांची रंगमंचावर साकारलेली गौरवशाली परंपरा मांडली असल्याचे त्या सांगतात.

- Advertisement -

पवार यांनी सांगितले आहे की, पुस्तक आणि ग्रंथ निर्मितीसाठी जो कागद वापरला जातो, तो ज्या झाडांपासून मिळतो त्या झाडांच आपण संवर्धन करायला हवं हे ज्ञान ज्या ग्रंथ आणि पुस्तकातून मिळतं याचं प्रतिक म्हणून या बुद्धीच्या ग्रंथातूनचं झाड उगवल्याची संकल्पना निसर्ग देखाव्यातून पवार कुटुंबीयांनी साकारली आहे. हा देखावा साकारताना यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल अशा निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या साहित्यायांचा वापर केलेला नाही. हा देखावा संपूर्णतः इको फ्रेंडली आहे.

6 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -