घरसंपादकीयदिन विशेषजागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन

Subscribe

 

 

- Advertisement -

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना ५ जून १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन द ह्यूमन एन्व्हायर्नमेंट येथे केली, ज्याचा परिणाम मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर झालेल्या चर्चेतून झाला होता.2 वर्षांनंतर १९७४ मध्ये ‘फक्त एक पृथ्वी’ या थीमसह पहिला जागतिक पर्यावरण दिन आयोजित करण्यात आला. प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो, ज्यात प्रमुख कार्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करतात. प्रत्येक ठिकाणी उपक्रम करून भाषणे करून, झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे आज कार्य केले जाते. या सर्वांतूनच या दिवसाची जागरूकता निर्माण होते.
जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करता येऊ शकेल. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करून वाढते कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू, यात शंका नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -