घरमुंबईLive Update : मनोहर जोशींना आयसीयूमधून बाहेर काढलं

Live Update : मनोहर जोशींना आयसीयूमधून बाहेर काढलं

Subscribe

5/6/2023 18:48:20 मनोहर जोशींना आयसीयूमधून बाहेर काढलं

5/6/2023 16:56:46 सुलोचना दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

- Advertisement -

5/6/2023 15:55:51 सुलोचना दीदींच्या अंत्ययात्रेला सुरुवात

5/6/2023 15:54:48 क्लस्टर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

5/6/2023 13:3:0 हसन मुश्रीफ यांना मुंबई हायकोर्टाकडून 20 जूनपर्यंत दिलासा

ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात मुश्रीफांना दिलासा


5/6/2023 12:48:17 सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा प्रकरण

परराज्यातील टोळी असल्याचा पोलिसांचा अंदाज

पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी दिली माहिती


5/6/2023 12:42:46 बदलापूर नजीक रत्नाकर महाराज यांच्या मठावर हल्ला प्रकरणी कॅप्टन आशिष दामले दोषी


5/6/2023 12:20:37 अकरावीची पहिली यादी 19 जूनला होणार जाहीर


5/6/2023 11:59:33 चित्रपटातील आदरांच्या नावांपैकी एक नाव सुलोचना दीदींचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यांची कारकिर्द ही थक्क करणारी

सुलोचना दीदींना मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा जास्त त्यांचे कार्य


5/6/2023 11:54:34 सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी एकनाथ शिंदे दाखल


5/6/2023 11:53:8 अमित शाहांसोबतच्या बैठकीत अनेक गोष्टींवर सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार

कॅबिनेट विस्तारावर सकारात्मक चर्चा झाली असून तो लवकरच होणार – मुख्यमंत्री शिंदे


5/6/2023 11:16:56 माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन

पत्नीला भेटण्यासाठी शर्मांना 3 आठवड्यांचा जामीन


5/6/2023 10:53:45 भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही –  बावनकुळे

भाजपाने ओबीसी नेत्याला देशाचं पंतप्रधान केले

ओबीसींच्या इम्पेरिकल डेटासाठी मविआने निधी दिला नाही

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली माहिती


5/6/2023 10:32:28 मालेगावात वीज पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

मालेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस


5/6/2023 9:58:59 अमित शाहांसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ट्वीट करत माहिती


5/6/2023 9:56:1 जेजुरीमध्ये ग्रामस्थांकडून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा अकरावा दिवस

मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी बाहेरील व्यक्तीची नियुक्ती केल्यामुळे ग्रामस्थांकडून आंदोलन सुरू

ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी


5/6/2023 9:38:23 नाशिकमध्ये भाजपा-शिवसेनेत वादाची ठिणगी

‘खासदार गोडसे गद्दार’, भाजपा नेत्याची पोस्ट

दिनकर पाटील यांच्याकडून पोस्ट

दिनकर पाटील भाजपाचे नगरसेवक

पाटील यांच्याकडून गोडसेंवर निशाणा

नाशिक लोकसभेवरून वादाची ठिणगी


5/6/2023 9:17:52 हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बॅरी न्यूमॅन यांचे निधन

वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॅनिशिंग पॉईंट’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली


5/6/2023 8:10:9 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

पुण्यातील कोथरुडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याला फडणवीस लावणार हजेरी

नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या शाम देशपांडे यांनी केले आहे आयोजन

फडणवीस यांच्यासोबत चंद्रकांत पाटीलही सोहळ्याला लावणार हजेरी


5/6/2023 7:40:28 पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक

शरद पवार करणार मार्गदर्शन

पक्षाचे सर्व नेते बैठकीला राहणार उपस्थित

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक

सकाळी 10. 30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे


5/6/2023 7:25:5 ओडिशा भीषण अपघाताच्या तब्बल 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना

रेल्वेमंत्र्यांनी मालगाडीला दाखवला हिरवा झेंडा


5/6/2023 7:13:30 ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

सुलोचना चव्हाण यांचे पार्थिव आज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत त्यांच्या प्रभादेवी येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे

सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार

दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार


5/6/2023 7:13:30 विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

नागपूर प्रादेशिख हवामान विभागाकडून अलर्ट जारी

अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -