घरसंपादकीयदिन विशेषजागतिक कर्करोग दिन

जागतिक कर्करोग दिन

Subscribe

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. पॅरिस येथे सन २००० मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा मांडण्यात आला. अशा प्रकारचा विषय हाताळणारी ही पहिलीच परिषद ठरली. या परिषदेत जगभरातील शासकीय उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्करोगविषयक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी पॅरिसच्या कर्करोगविषयक सनदेला मान्यता दिली.

प्रस्तुत सनद कर्करोगसंबंधित संशोधन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता आर्थिक गुंतवणूक करणे, कर्करोगग्रस्त रुग्णांचे जीवनमूल्य उंचावणे तसेच त्यांना योग्य उपचार देणे अशा तत्त्वांचा पुरस्कार करते. सनदेच्या दहाव्या कलमात अधिकृतरीत्या ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून जाहीर केला गेला. दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी, आंतरराष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण संघटना जागरूकता वाढविण्यासाठी आणि कर्करोगाबद्दल लोकांना जागरूक करण्याचे काम करते. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना जागतिक कर्करोग दिवसानिमित्त कर्करोगाशी निगडित रूपरेखा जाहीर करते.

- Advertisement -

या रूपरेखेला अनुसरून विविध आरोग्य संस्था आणि कर्करोग उपचार केंद्र यांद्वारे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या संस्थांद्वारे त्यांच्या संकेतस्थळांवर कर्करोगाविषयी माहिती प्रसारित केली जाते. कर्करोग प्रतिबंध, लवकर तपासणी, उपचार आणि काळजी याबद्दल आपल्याला आधीपासून माहीत असलेल्या गोष्टींचा वापर करून या आजाराला पळवून लावता येते. जगभरात दरवर्षी ८.२ दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो. तथापि कर्करोग होण्यास कारणीभूत असलेल्या गोष्टी टाळण्यासाठी निरोगी जीवनाचा अवलंब केला पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -