घरसंपादकीयओपेडइंटरनेट क्षेत्राला ‘बूस्टर डोस’ देणारे ५ जी

इंटरनेट क्षेत्राला ‘बूस्टर डोस’ देणारे ५ जी

Subscribe

५ जी नेटवर्कचा सर्वात मोठा फायदा उत्पादन क्षेत्रात होईल. स्मार्ट शहरे एकमेकांशी यामुळे जोडली जातील. तसेच शहरे आणि गावे यामुळे अधिक जलदरित्या यामुळे जोडली जाणार असून त्यांच्यामध्ये समन्वय साधणे यामुळे सहज शक्य होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपकरणांची निर्मिती करण्यास यामुळे मदत होणार आहे. तसेच सध्या देशात उपलब्ध असलेली वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणेही अधिक जलदरित्या यामुळे कार्यरत होतील. यामुळे वेळेत बचत होणार आहे. तसेच डॉक्टरांना दूरस्थ शस्त्रक्रिया करण्यासदेखील यामुळे आता शक्य होणार आहे. बँकिंग आणि इतर क्षेत्रातही यामुळे मोठे बदल घडविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

– रामचंद्र नाईक
‘व्हाट ए ग्रेट वर्क सरजी, इट्स स्टार्टेड ५ जी’, असा अनुभव सध्या भारतातील काही ५ जी इंटरनेट वापरकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. ४ जीच्या तुलनेत कैकपटीने अधिक वेगवान इंटरनेट म्हणून जगभरात प्रसिद्ध असणार्‍या ५जी सेवेला ऑक्टोबर महिन्यापासून देशभरातील विविध १३ शहरांमध्ये प्रारंभ करत भारताने इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांती घडविली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ५ जी सेवा सुरू करत वेगवान इंटरनेट वापरकर्त्या प्रगतीशील देशांमध्ये आता आपलाही समावेश झाला असल्याचे भारताने या माध्यमातून जगाला दाखवून दिले. ५जी इंटरनेट सेवा सुरू झाल्याने इंटरनेट क्षेत्राला खर्‍या अर्थाने एक प्रकारे ‘बूस्टर डोस’ मिळाला असून अनेक क्षेत्रात आगामी काळात यामुळे आमूलाग्र बदल झालेले दिसतील.

शैक्षणिक, वैद्यकीय आदींसह विविध क्षेत्रांमध्ये या सेवेचा मोठा उपयोग होणार आहे. ५जी सेवा सुरू करणारा भारत हा जगातील काही पहिला देश नाही. भारताआधी जवळपास ७० ते ७२ देशांमध्ये ५जीची सेवा सुरू झाली असून त्या देशांमध्ये या सेवेमुळे विविध क्षेत्रांचे रूपडे पालटल्याची स्थिती आहे. त्यामुळे भारतातही निश्चितच या सेवेमुळे विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होतील, यात शंका नाही. प्रगतीशील देशांसोबत स्पर्धा करण्यासाठी भारताला या तंत्रज्ञानाची गरज होतीच, ती अखेर पूर्ण झाल्याने येत्या काळात ५ जीमुळे विकासाला अधिक चालना मिळेल, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

- Advertisement -

४ जी इंटरनेटचा सर्वाधिक वेग हा सध्या ५० ते १०० एमबीपीएसच्या घरात आहे. तर ५जी इंटरनेट सेवेचा वेग हा ४जीच्या तुलनेत १० पटीने असून १ ते १० जीबीच्या घरात याचा वेग आहे. हाच या दोन्ही सेवांमधील मुख्य फरक आहे. इंटरनेटचा वेग वाढल्यामुळे मोठ्यातील मोठा व्हीडिओ, सिनेमा आदी एका झटक्यात डाऊनलोड होतील, त्यामुळे सर्वांसाठी हा एक वेगळा अनुभव असल्याचे सांगितले जात असले तरी ५ जीही खरी दुनिया ही यापेक्षा काही वेगळीच आहे. संरक्षण, वैद्यकीय, शैक्षणिक, विज्ञान आणि विविध उत्पादन या प्रमुख क्षेत्रांना याचा मुख्य फायदा होणार आहे. संरक्षण क्षेत्रात खास करून या सेवेचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.

संरक्षण क्षेत्रात अत्यावश्यक असणार्‍या आधुनिक उपकरणांची स्वदेशातच निर्मिती करण्यासाठी ५जी सेवेची नितांत आवश्यकता भासत होती. परदेशी तंत्रज्ञानाचे अनुकरण करत संबंधित उपकरणे भारतात निर्माण करण्यासाठी ४जी इंटरनेटमुळे काहीसा विलंब होत असे. कारण तेथे ५जी इंटरनेटच्या आधारावर तयार करण्यात आलेले तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा अभ्यास भारतात ४जीच्या आधारावर केला जात होता. या प्रक्रियेत बराच विलंब लागत असे. परिणामी त्याचे उत्पादन करण्यासही वेळ अधिकच खर्ची जात होता. परंतु, परदेशात उपलब्ध असणारे ५जी आता भारतातही सुरू झाल्याने इतर देशांच्या बरोबरीने संरक्षण क्षेत्रासाठी विविध उपकरणे स्वदेशातच निर्माण करण्यात भारताला यामुळे मोठी मदत होणार आहे.

- Advertisement -

५जी नेटवर्कचा सर्वात मोठा फायदा उत्पादन क्षेत्रात होईल. स्मार्ट शहरे एकमेकांशी यामुळे जोडली जातील. तसेच शहरे आणि गावे यामुळे अधिक जलदरित्या यामुळे जोडली जाणार असून त्यांच्यामध्ये समन्वय साधणे यामुळे सहज शक्य होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपकरणांची निर्मिती करण्यास यामुळे मदत होणार आहे. तसेच सध्या देशात उपलब्ध असलेली वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणेही अधिक जलदरित्या यामुळे कार्यरत होतील. यामुळे वेळेत बचत होणार आहे. तसेच डॉक्टरांना दूरस्थ शस्त्रक्रिया करण्यासदेखील यामुळे आता शक्य होणार आहे. बँकिंग आणि इतर क्षेत्रातही यामुळे मोठे बदल घडविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ४जी सेवेला सुरुवात झाली आणि विविध बँकिंग सेवा सहजरित्या स्मार्ट फोनमध्ये उपलब्ध झाल्या. डिजिटल व्यवहारांचे प्रमाण कमालीचे वाढले.

परंतु, दिवसेंदिवस वाढणार्‍या वापरकर्त्यांच्या संख्येमुळे यामुळे अनेकदा सातत्याने नेटवर्क एररच्या तक्रारी वाढत होत्या. एटीम मशीनसह विविध उपकरणे ही वेगवान इंटरनेटअभावी प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे पाहायला मिळत होते. परंतु, आता ५जीमुळे नव्या उपकरणांची निर्मिती करणे आणि ती सुलभरित्या सर्वांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आता सोपे होणार आहे. अनेक देशांमध्ये मेट्रो, ट्रॉय ट्रेन आणि विविध सार्वजनिक उपक्रम सेवा या चालकांविनाच धावत असल्याचे पाहायला मिळते. ५जी इंटरनेटमुळेच हे तंत्रज्ञान त्याठिकाणी वापरणे शक्य झाले आहे. त्यामुळे भारतातही काही सेवा आता पूर्ण क्षमतेने या तंत्रज्ञानाच्या आधारावर चालवणे सोपे होणार आहे. ५जीमुळे होणार्‍या काही निवडक क्षेत्रांतील बदलांचा येथे उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु, यापेक्षाही अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये यामुळे बदल होणार असून इंटरनेट क्षेत्रातील नव्या क्रांतीचे आपण साक्षीदार होणार आहोत.

शनिवार १ ऑक्टोबर रोजी भारतात ५जी सेवेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आता वेगवान असे इंटरनेटचे युग सुरू झाल्याचे देशवासीयांना सांगितले. हे तंत्रज्ञान केवळ व्हॉईस कॉल्स किंवा व्हीडिओ पाहण्यापुरते मर्यादित न राहता त्यातून एक नवीन क्रांती घडली पाहिजे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला होता. भारताआधी जगभरातील ७० ते ७२ देशांमध्ये यापूर्वीच ५जी इंटरनेट सेवा सुरू झाली असून तेथे हे बदल याचि देही याचि डोळा अनेकांनी अनुभवले आहेत. म्हणूनच आपल्याकडेही येत्या काळात विविध क्षेत्रात ५जीमुळे बदल घडणार, असा दावा केला जात आहे. दूरसंचार क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी ‘रिलायन्स जिओ’ची ५ जी सेवा डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण भारतात उपलब्ध होईल, असे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. तर ‘भारती एअरटेल’चे प्रमुख सुनील मित्तल यांनी म्हटले की, मार्च २०२४ पर्यंत ५जीची सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध होईल. २०३५पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेवर ५जीचा प्रभाव ४५० अरब डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

५जी नेटवर्क विकसित करण्याचे प्रयत्न जगात २०१३ सालीच सुरू झाले. सॅमसंग या जगप्रसिद्ध कंपनीने २०१३ मध्ये ५जीसाठीची चाचणी केली. त्यावेळी त्यांचा स्पीड १ जीबीपीएस होता. हे तंत्रज्ञान त्यांनी जगभरातील अनेक देशांना दिले आणि त्यानंतर हळहळू याचा वापर होण्यास सुरुवात झाली. २०१९पासून त्याची व्याप्ती आणखीनच वाढली आणि सध्या जगभरातील विविध देशांमध्ये ५जी सुरू केले जात आहे. सध्याच्या घडीला ५जी नेटवर्क जगभरातील ७० ते ७२ देशांमध्ये कार्यरत आहे. प्रत्येक देशांमध्ये याचा वेग कमी अधिक आहे. भारतात १ ते १० जीबीपीएसच्या घरात याचा वेग असण्याचा दावा केला जात आहे. जगभरातील विविध देशांमधील ५जी सेवेचा आढावा घेतल्यास याचा सरासरी डाउनलोड स्पीड ७०० एमबीपीएस इतका आहे.

५जी सेवेमध्ये, डेटा हा रेडिओ लहरींमधून खूप वेगानं प्रवास करेल आणि रेडिओ लहरी वेगवेगळ्या बँड आणि फ्रिक्वेन्सीमध्ये विभागल्या जातील. जे आताच्या ४जी इंटरनेट स्पीडपेक्षा शंभरपट अधिक वेगवान असेल. ५जी इंटरनेटनंतर वेगाअभावी मोठे अ‍ॅप्स बंद होणार नाहीत, असा समज अनेकांचा आहे. तसेच व्हीडिओ बफर होणार नाहीत आणि मोबाइल स्क्रीनवर न संपणारे डाउनलोड चिन्ह दिसणार नाही, असे अनेकांना वाटते. पण ५जीची कहाणी इथपर्यंतच मर्यादित नाही. यामुळे आणखी बरेच काही बदलेल. ड्रोनच्या वापरातून अनेक कामे करणे यामुळे शक्य होणार आहे. सरकारी किंवा खासगी संस्था अथवा इतरांवर यामुळे अवलंबून राहावे लागणार नाही. अनेक कामे स्वबळावरच करणे नागरिकांना यामुळे शक्य होणार आहे.

५जी नेटवर्क दोन प्रकारे काम करू शकते. सर्वप्रथम यासाठी स्वतंत्र नेटवर्क स्थापन करण्याची गरज असते. ज्यास ‘स्टँड अलोन नेटवर्क’ असे संबोधले जाते. दुसरे म्हणजे यासाठी अनेकदा आधीच स्थापन केलेले नेटवर्कही वापरले जाते, ज्यास ‘नॉन स्टँड अलोन नेटवर्क’ म्हणून ओळखले जाते. परंतु, असे असले तरी जगात जेथे ‘नॉन स्टँड अलोन नेटवर्क’वर ५जी सुरू करण्यात आले असले त्याठिकाणी ‘स्टँड अलोन नेटवर्क’चीही गरज पडल्याचा अनुभव आहे. त्यामुळे ५जी स्पीडचा मार्ग देशभरात अधिक खुला करण्यासाठी ‘रेडिओ नेटवर्क’च्या पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करावी लागेल.

तसेच ३जी आणि ४जी नेटवर्क पूर्वीप्रमाणेच चालू राहील, हेसुद्धा नेटवर्क पुरवठादार कंपन्यांना सुनिश्चित करावे लागेल. ५जी तंत्रज्ञान हे नवीन आणि महाग तंत्रज्ञान असून त्यासाठी अधिक गुंतवणूक आवश्यक आहे आणि त्याचे नेटवर्क उभारण्यासाठी अधिक संख्येने टॉवर्स लागतील. म्हणूनच यासाठी अधिक खर्च आणि वेळ लागणार आहे. त्यामुळे ते ४जीच्या तुलनेत ते काहीसे महागच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण, देशात एक मोठा ग्राहक वर्ग आहे जो ५जी मोबाईल खरेदी करू शकत नाही किंवा त्यासाठीच्या महागड्या डेटाची किंमतही देऊ शकत नाही, हेसुद्धा भारतातील ५जी समोरच एक आव्हान आहे.

५जी नेटवर्कच्या विस्ताराचे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे वायरलेस तंत्रज्ञानाचा भौगोलिकदृष्ठ्या विस्तार करणे आणि दुसरा म्हणजे त्याचा वापर वाढवणे. नेटवर्कचा विस्तार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठीअनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतील. त्यामुळे भारतात याचा विस्तार करण्यास वेळ लागू शकतो. जर ४ जीमध्ये अडचणी येत आहेत, तर ५ जी मध्येही येणारच. कारण ५ जीसाठी अजूनच दाट नेटवर्कचे जाळे हवे. जे विस्तारण्यासाठी सध्या प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच सध्या ऑपरेटर्स सुरुवातीला अशा जागी ५जी नेटवर्क सुरू करण्यावर भर देतील, जिथे त्यांना या सेवेसाठी जास्त पैसे मोजणारे ग्राहक मिळू शकतात.

त्यांचा सुरूवातीचा कल हा उद्योग-व्यवसायांकडे असेल. त्यामुळे ५जी सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. एका अभ्यासातून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात ज्या शहरांमध्ये ५जीची सेवा सुरू झाली त्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी ५जी सेवेत सहभागी व्हायची इच्छा असेलेले जवळपास १० कोटी वापरकर्ते आहेत. या ग्राहकांकडे ५जी स्मार्टफोन आहेत आणि ते पुढील १२ महिन्यांत वेगवान इंटरनेटशी कनेक्ट होऊ इच्छित आहेत. तसेच ५जीची तयारी जगात सर्वांत जास्त वेगाने भारतात दिसून आली आहे. भारतातील ५जी नेटवर्ककडे जाण्याची ग्राहकांची इच्छा इंग्लंड किंवा अमेरिकेसारख्या प्रगत बाजारपेठांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे. म्हणूनच भारतात ५जी सेवा लवकरात लवकर सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -