घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नविये आवडीचेनि भरें | कामुक निज वनिता विसरे | मग पाडेंवीण अनुसरे | भ्रमला जैसा //
ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या मनुष्याप्रमाणे योग्यतेवाचून तिच्या नादी लागतो,
कीं तपोबळें ऋद्धी | पातलिया भ्रंशे बुद्धी | मग तया विरक्तता सिद्धी | आठवेना //
किंवा तपश्चर्येच्या योगाने ऋद्धीसिद्धी प्रसन्न झाल्या असता वैराग्यशील पुरुषांच्या बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही,
तैसें अर्जुना तेथ जाहलें | असतें पुरुषत्व गेलें | जें अंत:करण दिधलें | कारुण्यासी //
त्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या अंतःकरणात दयेला थारा दिल्यामुळे त्याचा असलेला पुरुषार्थही नाहीसा झाला.
देखा मंत्रज्ञु बरळु जाय | मग तेथ का जैसा संचारु होय | तैसा तो धनुर्धर महामोहें | आकळिला //
असे पहा की, मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकू लागला म्हणजे त्यालाच भूतबाधा होते, त्याप्रमाणे अर्जुनाला महामोहाने ग्रासले.
म्हणौनि असतां धीरु गेला | हृदया द्रावो आला | जैसा चंद्रकळीं शिवतला | सोमकांतु //
त्यामुळे त्याचे स्वाभाविक धैर्य नष्ट झाले. त्याच्या हृदयात दयेचा पाझर फुटला ! ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होण्याबरोबर चंद्रकांतमण्यास पाझर फुटतो,
तयापरी पार्थु अतिस्नेहें मोहितु | मग सखेद असे बोलतु | श्री अच्युतेंसी //
त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला व खेदयुक्त अंतःकरणाने श्रीकृष्णाशी बोलू लागला.
तो म्हणे अवधारी देवा | म्यां पाहिला हा मेळावा | तंव गोत्रवर्गु आघवा | देखिला एथ //
अर्जुन म्हणाला,‘देवा हे पहा-मी हा सर्व सैन्यसमुदाय पाहिला, तो येथे सर्व माझे गोत्रजच माझ्या दृष्टीस पडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -