घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नातरी आथिलेपणें सरिशी । कवणी आहे लक्ष्मिये ऐसी? । श्रियेसारिखिया दासी । घरीं जियेतें ॥
किंवा संपन्नपणात लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक आहे का? तिच्या घरी सिद्धीसारख्या दासी आहेत.
तियां खेळतां करिती घरकुलीं । तयां नामें अमरपुरें जरि ठेविलीं । तरि न होती काय बाहुलीं । इंद्रादिक तयांचीं? ॥
त्या दासी आपल्या खेळात जी घरकुली करतात त्याचे नाव जर अमरपुरी ठेविले, तर इंद्रादिक देव हे त्यांच्या घरकुल्यातील बाहुली होणार नाहीत काय?
तिया नावडोनि जेव्हां मोडिती । तेव्हां महेंद्राचे रंक होती । तिया झाडा जेउते पाहती । ते कल्पवृक्ष ॥
पुढे त्या दासींना ती घरकुली न आवडून जेव्हा ती मोडतात, तेव्हा इंद्राचे रंक बनतात व त्या ज्या वृक्षाकडे पाहतात ते वृक्ष कल्पवृक्ष होतात.
ऐसिया जियेचिया जवळिका । सामर्थ्य घरींचिया पाइका । ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ ॥
असे तिच्या घरातील दासींचे सामर्थ्य आहे, त्या पट्टराणी श्रीलक्ष्मीचीही या ठिकाणी प्रतिष्ठा नाही.
मग सर्वस्वें करूनि सेवा । अभिमानु सांडूनि पांडवा । ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहाली ॥
मग अर्जुना, मनोभावाने सेवा करून व सर्व अभिमान टाकून ती पाय धुण्याच्या अधिकारास पात्र झाली!
म्हणौनि थोरपण पर्‍हां सांडिजे । एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे । जैं जगा धाकुटें होइजे । तैं जवळीक माझी ॥
म्हणून, थोरपणा एकीकडे ठेवून व सर्व शास्त्रीय ज्ञानाचा अभिमान विसरून, जगात नम्रपणाने वागावे, तेव्हाच माझी प्राप्ती होते.
अगा सहस्रकिरणांचिये दिठी । पुढां चंद्रही लोपे किरीटी । तेथ खद्योत कां हुटहुटी । आपुलेनि तेजें? ॥
हे किरीटी, ज्या ठिकाणी सूर्याच्या तेजापुढे चंद्रही लोपून जातो, तेथे काजव्याने आपल्या तेजाबद्दल का घमेंड करावी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -