घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग आत्मबोधींचें सुख । जें संयमाग्नीचें हुतशेष । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥
आणि संयमाग्नीत इंद्रियादिक होमद्रव्याचे हवन करून बाकी राहिलेले जे आत्मसुख, तेच पुरोडाश म्हणून घेतले.
एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं । या यज्ञक्रिया तरी आनानीं । परि प्राप्य तें एक ॥
कोणी अशा रीतीने यज्ञ करून त्रिभुवनात मुक्त झाले; म्हणून या यज्ञक्रिया जरी नानाप्रकारच्या आहेत, तरी त्यांची अखेर फलप्राप्ती एकच आहे.
एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रीया निपजविती । एक योगयागुही आहाती जे सांगितले ॥
हे जे योग सांगितले, त्यापैकी एकाला ‘द्रव्ययज्ञ’ म्हणतात, एकाला (तपसामर्थ्याने केलेला) ‘तपोयज्ञ’ म्हणतात, एकाला (अष्टांगसाधनाने साधलेला)‘योगयज्ञ’ म्हणतात.
एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥
ज्यामध्ये शब्दाने शब्दाचा होम केला जातो, त्याला ‘वागयज्ञ’ म्हणतात आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्म मिळते, त्याला ‘ज्ञानयज्ञ’ म्हणतात.
हें अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडें । परी जितेंद्रियासीचि घड़े । योग्यतावशें ॥
अर्जुना हे सर्व यज्ञ फार बिकट असून यांचे आचरण करणे फार दुर्घट आहे; परंतु ज्याने इंद्रिये जिंकिली आहेत, त्यास मात्र ते अधिकारपरत्वे करता येतील.
ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धी आथिले । म्हणौनि आपणपां तिहीं केलें । आत्महवन ॥
योगसमृद्धीने सुसंपन्न असलेले पुरुषच हे यज्ञ करू शकतील. कारण त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याचे ठिकाणी हवन केलेले असते.
मग अपानाग्नीचेनि मुखीं । प्राणद्रव्यें देखीं । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥
कोणी अभ्यासाचे योगाने अपानवायुरूप अग्नीत प्राणवायुरूप द्रव्याचे हवन करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -