घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तो गीतेमाजीं षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा । जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥
क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची प्राप्ती झाली, त्याप्रमाणे गीतेमध्ये सहाव्या अध्यायाचा प्रसंग उत्तम असून तो बुद्धिने जाणावयाचा आहे.
तैसें गीतार्थाचें सार । जें विवेकसिंधूचें पार । नाना योगविभवभांडार । उघडलें कां ॥
तो अध्याय गीतार्थाचे सार होय व आत्मानात्मविचाररूपी समुद्राचा पैलतीर होय; अथवा जणूकाय योगसंपत्तीचा जामदारखानाच उघडला आहे.
जें आदिप्रकृतीचें विसवणें । जें शब्दब्रह्मासि न बोलणें । जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥
जे आदिमायेचे विश्रांतिस्थान व ज्या ठिकाणी वेदानाहि मौन धारण करावे लागते आणि ज्यापासून गीतारूप वेलीला अंकूर फुटला,
तो अध्यावो सहावा । वरि साहित्याचिया बरवा । सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देऊनी ॥
तो हा सहावा अध्याय सर्व अलंकारादी साहित्यांनी परिपूर्ण असा सांगेन, तो लक्ष देऊन ऐका. अशी महाराज संतांना विनंता करतात.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजा जिंकें । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥
माझे बोल शुद्ध प्राकृत आहेत खरे; परंतु ते प्रतिज्ञेने सहज अमृत्तालाही जिंकतील अशा गोड अक्षरांनी मी सांगेन.
जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे । वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥
त्या लोकांच्या मृदुपणाने सप्तस्वरांपासून होणारा आनंदही कमी असा भासेल किंवा त्यांच्या छंदाने सुवासही कमीपणा पावेल.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा । बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥
पहा की, गोडीच्या आशेने कानालाच जिव्हा फुटतील व इंद्रिये आपापसात भांडण करू लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -