घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येरी जीवभावाचिये पालविये । कांहीं मर्यादा करूं नये । पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ॥
या व्यतिरिक्त नानाप्रकारच्या जीवांच्या विस्ताराची मर्यादा करता येत नाही. यांची कोणापासून निर्मिती होते हे पाहू गेले तर त्याचे मूळ मायाच आहे.
म्हणौनि कर्ता मुदल न दिसे । आणि सेखीं कारणही कांहीं नसे । माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ॥
म्हणून, मुळात कर्त्याचा ठिकाण नसून आणि शेवटी काही कारणहि नसता मध्येच कार्याची आपोआप वाढ होते.
ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारु । निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ॥
अशा प्रकारे, अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्यावाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार, त्याला कर्म असे म्हणतात.
आतां अधिभूत जें म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥
आता ‘अधिभूत’ ज्याला म्हणतात ते थोडक्यात सांगतो ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लोप पावतात,
तैसें असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां ॥
त्याप्रमाणे, ज्याचे अस्तित्व खोटे असून खरोखर पाहू गेले असता जे होत नाही व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन रूपाला आणतात.
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरी दिसे । जें वियोगावेळे भ्रंशें । नामरूपादिक ॥
जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते त्यांच्याच संयोगाने दृष्टीस पडते व विनाशकाली लय पावते, असे जे नावरूप,
यातें अधिभूत म्हणिजे । मग अधिदैव पुरुष जाणिजे । जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें ॥
त्याला ‘अधिभूत’ असे म्हणतात. मग अधिदैवत म्हणजे जीव असे समजावे. तो प्रकृतीने उत्पन्न केलेल्या भोगांचा उपभोग घेतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -