घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअवघ्या साडेसहा मिनिटांत नाशिक पोलिसांची मदत

अवघ्या साडेसहा मिनिटांत नाशिक पोलिसांची मदत

Subscribe

नाशकात डायल ११२ चा रिप्लॉन्स टाईम दरवर्षी होतोय कमी

dial 112 रिपॉन्स टाईम

2021 अर्धा तास

2022  ९ मिनिटे

2023  साडेसहा मिनिटे

अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी, यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयात सुरु झालेल्या डायल ११२ हेल्पलाईनला नाशिककरांनी वर्षभरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. पोलिसांनी मदतीसाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने अनेक अनुचित घटना टाळण्यात पोलिसांना यश आले आहे. दरवर्षी पोलिसांचा घटनास्थळी पोहोचण्याचा रिपॉन्स टाईम कमी होत आहे. डायल ११२ वर जानेवारी ते १३ डिसेंबरपर्यंत तब्बल ३० हजार ८२९ कॉल आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीची प्रतिमा उंचावण्यास मदत होत आहे.
गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी आणि घटनास्थळी कमीत कमी वेळेत पोहोण्यासाठी राज्यातील पोलीस दलाने २०२१ मध्ये अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणतीही घटना घडल्यास तातडीने ११२ क्रमांक डायल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत.  डायल ११२ ही २४ तास हेल्पलाईन सुरु आहे.
तक्रारदार व्यक्तींचे सर्व तक्रारी कॉल प्रथम पोलीस आयुक्तालयात जातो. तेथे तक्रारीसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित पोलीस ठाण्याला पाठविला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती दिली जाते. त्यानुसार नागरिकांना मदत मिळत आहे.
डायल ११२ या हेल्पलाईनला नाशिककरांनी वर्षभरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. १ जानेवारी ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत तब्बल ३० हजार ८२९ कॉल आले. त्यातील २५ टक्के कॉल महिला सुरक्षेसंदर्भात आहेत. कॉलच्या लोकेशनुसार पोलीस अवघ्या साडेसहा मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचले आहेत. कॉलनुसार गुन्ह्याची माहिती घेतली जाते. त्यानुसार संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात आणत कारवाई केली जाते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस मदत करतात.
– प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, नाशिक
महिनेनिहाय कॉल
जानेवारी 3,056
फेब्रुवारी 2,946
माच 3,099
एप्रिल 3,189
मे 3,725
जून 3,260
जुलै 2,710
ऑगस्ट 2,613
सप्टेंबर 2,765
ऑक्टोबर 3,979
नोव्हेंबर 3,805
१३ डिसेंबरअखेर 1,679

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -