घरमनोरंजनपडद्यावर महाभारत...कठिण

पडद्यावर महाभारत…कठिण

Subscribe

आमिर खान बॉलिवूडमधील सर्वात बिजबजेट चित्रपट बनवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. हा चित्रपट महाभारत कथेवर आधारीत असल्याची चर्चा होती.

आमिर खान बॉलिवूडमधील सर्वात बिजबजेट चित्रपट बनवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. हा चित्रपट महाभारत कथेवर आधारीत असल्याची चर्चा होती. सुमारे १ हजार कोटींचा खर्च त्याठी होणार असल्याचीही माहिती होती. हा बिग बजेट सिनेमा भागांमध्ये बनवला जाणार असल्याची माहिती होती. पण आमिर खानने व्यवहारीक दृष्टीने ही बाब कठिण असल्याचे म्हटले आहे. कारण एवढा बिग बजेट सिनेमा तयार करणं हे आव्हानात्मक आहेच. शिवाय त्याचं शूटींग, कलाकारांच्या तारखा मिळणंही अवघड होतं. शिवाय पुढील पाच वर्षे हा प्रोजेक्ट चालवला जाणार असल्याचे समोर आल्याने आमिर खानने या बिग बजेट महाभारतचा विषय जरा बाजूला ठेवला आहे.

पडद्यावरच्या महाभारत मध्ये आमिर स्वतः भगवान कृष्णाची भूमिका करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण आपल्याला महाभारतातील कर्ण ही व्यक्तीरेखा जास्त आवडते असंही आमिरने स्पष्ट केले होते. शिवाय हा भव्यदिव्य प्रोजेक्टसाठी आवश्यक तंत्र, दिग्दर्शन आणि इतर बाबी जमून येण्यासाठी वेळ लागणार होता. शिवाय विषय महाभारताचा असल्याने वाद विवाद होण्याची शक्यताही आहे. त्याचा विपरित परिणाम चित्रपटावर झाल्यास निर्मात्याला कोट्यवधींचा फटका बसू शकतो. या शक्यतेमुळेही आमिरने महाभारतचा विषय बाजूला ठेवल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -