घरमनोरंजनजम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता संदीप पाठकचा सन्मान

जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता संदीप पाठकचा सन्मान

Subscribe

हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे.

अभिनेता संदीप पाठकने(sandip pathak) त्याच्या अभिनय शैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. संदीप पाठकच्या राख चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अलीकडच्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’(rakh) चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठकला गौरविण्यात आले आहे. अशातच आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठक याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावत आपल्या यशाची मालिका सुरुच ठेवली आहे. 15 देशांचे 54 चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते.(Jammu International Film Festival)

हे ही वाचा – भारतीय संगीतकार ए. आर. रहमानचा कॅनडात आगळावेगळा सन्मान

- Advertisement -

या संदर्भात पुरस्कार स्वीकारल्यानंतर संदीप पाठकसुद्धा व्यक्त झाला आहे. ‘आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’(rakh) चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी असल्याचे संदीप पाठक म्हणाला.

हे ही वाचा – एक पुरस्कार दोन नामांकने; आलियाच्या कोणत्या चित्रपटाची होणार ऑस्करसाठी निवड?

- Advertisement -

संदीप पाठक नेहमीच चित्रपटांमधून विविध भूमिका साकारताना दिसतो. त्याने साकारलेल्या भूमिकांना प्रेकक्षकांची सुद्धा पसंत मिळते. दरम्यान, ‘राख’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलंय. लवकरच ‘राख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे ही वाचा – चाहत्याच्या पाया पडतोय हृतिक रोशन; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -