घरमनोरंजनचाहत्याच्या पाया पडतोय हृतिक रोशन; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

चाहत्याच्या पाया पडतोय हृतिक रोशन; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Subscribe

हृतिकने रोशनने मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान त्याला तिथे त्याचे अनेक चाहते भेटले. त्यातील एका चाहत्याच्या पायाला स्पर्श करत ह्रितिकने तिथे असलेल्या सर्वांनाच अश्यर्य चकित केलं.

बॉलिवूडचा लोकप्रिय आणि हँडसम हंक म्ह्णून हृतिक रोशनला(hrithik roshan) ओळखलं जातं. हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा'(vikram vedha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेता हृतिकचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शनिवारी हृतिकने रोशनने मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान त्याला तिथे त्याचे अनेक चाहते भेटले. त्यातील एका चाहत्याच्या पायाला स्पर्श करत हृतिकने तिथे असलेल्या सर्वांनाच अश्यर्य चकित केलं.

हे ही वाचा – ‘द कपिल शर्मा’च्या चौथ्या पर्वात असणार ‘हे’ नवे 5 कलाकार

- Advertisement -

कार्यक्रमादरम्यान हृतिक रोशन(hrithik roshan) स्टेजवर येताच त्याच्या एका चाहत्याने हृतिकच्या पायाला स्पर्श केला. पण त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता हृतिकने ही चाहत्याच्या पायाला स्पर्श केला. हृतिकचा हाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अत्यंत स्टायलिश आणि हॅण्डसम अभिनेता म्ह्णून हृतिकच्या लूकची नेहमीच चर्चा असते. या कार्यक्रमाच्या वेळीही तो पिवळ्या रंगाचा को-ऑर्डर सेट परिधान केलेला दिसत आहे. हृतिकच्या या लुकची सुद्धा चर्चा होत आहे. हृतिक रोशनचे सोशल मिडिड्यावर अनेक चाहते सुद्धा आहेत. हृतिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यापासूनच बॉलिवूड कलाकार आणि ताच्या चहात्यांकडून ह्रितिक रोशनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

हे ही वाचा – आनंद दिघेंच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रसाद ओकने केली मोठी घोषणा; लेखन क्षेत्रात करतोय पदार्पण

हृतिक रोशन लवकरच ‘विक्रम वेधा'(vikram vedha)या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत सैफ अली खानहीसुद्धा झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक याच शीर्षकाने बनला आहे. हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शनही पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. ज्याने तामिळ चित्रपट बनवला. हृतिकच्या या नव्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा – माझी बाजू न मांडता तुझी इज्जत वाचवली…उर्वशी रौतलेचा ऋषभ पंतवर निशाणा

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -