एक पुरस्कार दोन नामांकने; आलियाच्या कोणत्या चित्रपटाची होणार ऑस्करसाठी निवड?

आता आलिया भट्टच्या दोन चित्रपटांना थेट ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. पण त्या पैकी नेमका कोणता चित्रपट ऑस्कर पुरस्कार पटकावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अभिनेत्री आलीया भट्ट हिने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड मध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आलियाला आत्तापर्यंत वेगवगेळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट मिळाले. त्या चित्रपटांमध्ये आलिया भट्टने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या या सगळ्या भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुक केले. पण आता आलिया भट्टच्या दोन चित्रपटांना थेट ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. पण त्या पैकी नेमका कोणता चित्रपट ऑस्कर पुरस्कार पटकावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा – Ranbir Kapoor, Alia Bhatt Wedding : आलिया रणबीर थिरकले मलायकाच्या पॉप्युलर गाण्यावर; व्हिडिओ व्हायरल…

१) अभिनेत्री आलिया भट्टने तिला जी भूमिका मिळाली त्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. आणि हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

२) पुरस्कार सोहळ्यांमधला ऑस्कर पुरस्कार हा महत्वाचा मानला जातो. पण या वर्षी अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या दोन चित्रपटांना ऑस्कर नामांकन मिळाल्याचं बोललं जात आहे.

३) सध्या संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन असलेला आणि आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत समाविष्ट झाला आहे. या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलियाबने एका सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक सुद्धा झाले.

४) यासोबतच RRR हा सुपर हिट चित्रपटसुद्धा ऑस्करच्या शर्यतीत आहे. या चित्रपटातसुद्धा आलिया भट्ट महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. तिच्या या भूमिकेचं सुद्धा प्रेक्षकांनी कौतुक केलं.

५) आलियाचे हे दोन्ही चित्रपट सुपर हिट ठरेल. दरम्यान या दोन चित्रपटांपैकी नक्की कोणता चित्रपट माजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना सुद्धा आहे.