Eco friendly bappa Competition
घर ट्रेंडिंग Video : पोळी लाटता लाटता 'तिला' सापडला जीवनाचा 'सूर'

Video : पोळी लाटता लाटता ‘तिला’ सापडला जीवनाचा ‘सूर’

Subscribe

अलीकडे सोशल मीडियावर वारंवार विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. याचं सोशल मीडियावरुन काहीजण रातोरात स्टार देखील झाले आहेत. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक सामान्य कुटुंबातील महिला पोळी लाटता लाटता गाणं मधूर आवाजात गात आहे. या महिलेचं हे गाणं ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर युजर्स महिलेचं प्रचंड कौतुक देखील करत आहेत. फक्त नेटकरीच नव्हे तर आता या महिलेच्या गाण्याचं कौतुक अभिनेता सोनू सूदने देखील केलं आहे.

सोनू सूदने दिली गाण्याची ऑफर

सध्या व्हायरल होत असलेल्या महिलेल्या गाण्याचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत. खरंतर, या व्हिडीओमध्ये एका सामान्य कुटुंबातील महिला गॅससमोर बसून पोळ्या लाटत आहे. त्यावेळी त्या महिलेची मुलगी तिला गाणं गाण्यास सांगते. त्यावेळी ती महिला ‘नैना सावन भादो’ हे गाणं मधूर आवाजात गाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. यावर अभिनेता सोनू सूदने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्याने लिहिलंय की, “नंबर पाठवा, आई चित्रपटासाठी गाणं गाणार,” असं सोनू सूद म्हणाला.

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर महिलेच्या गाण्याचं आणि सोनू सूदच्या दिलदारपणाचं नेटकरी प्रचंड कौतुक करत आहेत. सोनू सूद नेहमीच अनेकांची मदत करतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्याने दुबई एअरपोर्टवरील एका बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची मदत केली होती, शिवाय कोरोनाकाळात देखील तो अनेक गरीबांच्या मदतीला धावून आला होता.

 


- Advertisement -

हेही वाचा :

Google Search ला मायक्रोसॉफ्टच्या Chat GPTची कडवी टक्कर, जाणून घ्या वैशिष्ट्य

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -