घरमनोरंजनटीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक

Subscribe

गहनाला आज मुंबई कोर्टात हजर करण्यात येणार असून तिची चौकशीही होणार आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठाला मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. एका वेबसाईटवर अडल्ट व्हिडिओ शुट करत तो शेअर केल्या प्रकरणी तिला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने मालाडमधील मड बेटावरील ग्रीन पार्क बंगल्यावर छापा टाकला होता. गहनाला आज मुंबई कोर्टात हजर करण्यात येणार असून तिची चौकशीही होणार आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या छाप्यात पोलिसांनी यासमीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली आहे. गहानाने आत्तापर्यंत ८७ अश्लील व्हिडिओ आणि पॉर्न व्हिडिओ शूट केले आहेत . आणि ते तिच्या वेबसाईटवर अपलोट केले आहेत. या चॅनेलची सदस्यता घेतलेल्या लोकांना 2 हजार रुपये हे व्हीडिओ पाहण्यासाठी द्यावे लागतात. अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने दिली आहे. मिस आशिया बिकिनीचा ताज जिंकणाऱ्या गहना हिने हिंदी, तेलगू सिनेमांमध्ये आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून मालाड मड समुद्र किनाऱ्यावरील अनके खाजगी बंगले, हॉटेल्स, लॉजवर वेश्या व्यवसाय आणि शार्ट पॉर्न व्हिडिओचे शूट चालते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या बंगल्यावरही छापे मारले. यावेळी काही टोळ्या तरुण मुलींना सिनेमात काम देण्याचे अमिष दाखवून अश्लील व्हिडिओंमध्ये काम करून घेत होत्या. या रॅकेटमधून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली ज्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वेबसाईटविरोधात तीन जणांनी तक्रारही दाखल केली होती. यामध्ये त्यांच्याकडून जबरदस्तीने अश्लील शूट करवून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -