घरमनोरंजन'या' चित्रपटात किरण ऍथलिटच्या भूमिकेत

‘या’ चित्रपटात किरण ऍथलिटच्या भूमिकेत

Subscribe

‘जयडी’ च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली ‘राजकन्या’ म्हणजेच किरण ढाणे. ‘लागीरं झालं जी’ मधल्या मनावर राज्य केल्यानंतर किरण सध्या ‘राजकन्या’ या मालिकेतून आपल्याला रोजच भेटते. आत्ता लवकरच ती रुपेरी पडद्यावर एंट्री घेणार आहे. धोंडिबा़ बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित तसेच जगप्रसिद्ध “कान्स चित्रपट महोत्सव” मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे निवडण्यात आलेली ‘पळशीची पीटी’ या आगामी मराठी चित्रपटातून किरण एका ध्येयवेड्या ऍथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. ग्रीन ट्री प्रोडक्शन प्रस्तुत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजलेला ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट ग्रामीण भागातील मुलांचं भविष्य अधोरेखित करतो.

- Advertisement -

किरणने आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ‘पळशीची पीटी’ मधील भागीची भूमिका ही अधिक जोखमीची ठरेल. माळरानात मेंढपाळ करणाऱ्या साधारण कुटुंबात जन्मलेली ही भागी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत नॅशनल ऍथलेट बनण्याचा मान पटकावते. या साहस कथेला सलाम करावासा वाटेल इतकी समरसून ही व्यक्तिरेखा किरणने साकारली आहे. अनेक नामांकन आणि पुरस्कार विजेत्या किरणला या व्यक्तिरेखेविषयी विचारले असता, ”येणारी प्रत्येक संधी मी आव्हान म्हणून स्विकारते. अपेक्षांची उंची गाठायची असेल तर नवनवीन आव्हानं सुद्धा स्विकारता आली पाहिजे आणि ही ताकद मला माझ्या रोजच्या कामांतून मिळते” असं किरण म्हणते.

- Advertisement -

‘लागीरं झालं जी’ मध्ये शितलीच्या काकाच्या भूमिकेतील अभिनेते धोंडिबा बाळू कारंडे यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले आता त्यांच्यातल्या दिग्दर्शकाला देखील तितकीच लोकप्रियता लाभेल अशी आशा आहे. ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा ‘पळशीची पीटी’ हा त्यांचा चित्रपट तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतो. मराठी मनोरंजन क्षेत्रात नावावरूनच कुतूहल जागं करणाऱ्या या चित्रपटाची चर्चा सध्या रंगत असून येत्या २३ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -