घरमनोरंजन'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत आर्चीला जायचंय डेटवर!

‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत आर्चीला जायचंय डेटवर!

Subscribe

एका मराठी कार्यक्रमात रिलेशनशिपबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना आर्चीने एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला डेट करायची इच्छा केली व्यक्त

सैराट चित्रपटाद्वारे अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू अर्थात आर्ची सैराटमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री बनली. सध्या ती कोणत्या न कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या सैराटनंतर आर्चीच्या लव्ह लाईफबद्दल काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना असतेच. मात्र इतरवेळी आपल्या रिलेशनशिप किंवा प्रेमाबद्दल न बोलणाऱ्या आर्चीने रिलेशनशिप बद्दल खुलासा केला नाहीतर बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला डेट करण्याची इच्छा असल्याचे देखील बोलून दाखवले.

View this post on Instagram

Elegance is the only beauty that never fades.?

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

- Advertisement -

एका मराठी टेलिव्हिजन वाहिनीवरील कार्यक्रमात रिलेशनशिपबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना आर्चीने एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला डेट करायची इच्छा व्यक्त केली. एक दिवस डेटवर जायचे असेल तर कोणासोबत जायला आवडेल? असा प्रश्न विचारला असता रिंकूने थेट विकी कौशलचं नाव घेत तो तिला खूप आवडतो असे देखील सांगितले.

View this post on Instagram

"Confident breeds beauty".

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

- Advertisement -

उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटानंतर अभिनेता विकी कौशलने “लस्ट स्टोरीज” या वेबसिरीज मध्ये अभिनय केला होता. विकीचा हा अभिनय पाहून रिंकू विकीच्या प्रेमात पडली. त्यामुळे आता रिंकूची ही इच्छा पूर्ण होणार की नाही? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना सध्या आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -