घरमनोरंजन'हे' आहे समीरा रेड्डीच्या मुलीचे नाव

‘हे’ आहे समीरा रेड्डीच्या मुलीचे नाव

Subscribe

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई झाली. तिला कन्यारत्न झाले.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री समीरा रेड्डी हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता या मुलीचे नाव समीराने सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर समीराने तिच्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये ती तिच्या मुलासोबत मुलीच्या नावाचे पोस्टर हातात घेतले आहे.

- Advertisement -

‘लिटील लेडीचं वर्दे कुटुंबात स्वागत’

व्यावसायिक अक्षय वर्देशी समीरा रेड्डीने विवाह केला. १२ जुलै रोजी समीराने एका गोंडस मुलीला जन्म दिला. समीराला एक मुलगासुद्धा आहे. या मुलीच्या जन्मानंतर समीरा आणि अक्षय दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. त्यामुळे रेड्डी आणि वर्दे कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. समीराने आपल्या छकुलीचे नाव सर्वांना कळावे यासाठी सोशल माध्यमाचा आधार घेतला आहे. त्यानुसार समीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलीच्या नावाची पोस्ट केली आहे. तिने पोस्ट केलल्या फोटोत समीराने तिच्या हातात ठळक अक्षरात मुलीचे नाव लिहिलेला पेपर घेतला आहे. त्यानुसार समीराने आपल्या मुलीचे नाव नायरा असे नाव ठेवले आहे. तिच्यासोबत फोटोमध्ये तिचा मुलगासुद्धा दिसत आहे. या फोटोत समीरा आणि तिच्या मुलाने हातात ‘नायरा’ या नावाचं पोस्टर घेतलं आहे. या फोटोसोबत ‘लिटील लेडीचं वर्दे कुटुंबात स्वागत’ असा मजकूर देखील लिहिण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -