घरमनोरंजन'भेडिया' चित्रपटातील 'ठुमकेश्वरी' गाण्यात श्रद्धा कपूरला पाहताच सोशल मीडियावर 'स्त्री 2'ची चर्चा

‘भेडिया’ चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ गाण्यात श्रद्धा कपूरला पाहताच सोशल मीडियावर ‘स्त्री 2’ची चर्चा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित आगामी ‘भेडिया’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ गाणं प्रदर्शित झालं आहे. मात्र, आता या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांनी श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ चित्रपटाचा अंदाज लावायला सुरुवात केली आहे. खरंतर हे गाणं वरुण धवन आणि कृति सेनन वर चित्रीत करण्यात आलं आहे. मात्र गाण्याच्या शेवटी श्रद्धा कपूरची एन्ट्री दिसत आहे. त्यामुळे श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ची ही हिंट असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, 2018 मध्ये श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये श्रद्धा सोबत राजकुमार राव देखील मुख्य भूमिकेत दिसून आला होता. त्यावेळी याचं चित्रपटामध्ये ‘आओ कभी हवेली पे’ गाण्यामध्ये कृति सेनन दिसून आली होती. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, निर्मात्यांकडून या चित्रपटाती कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

- Advertisement -

तसेच आता ‘भेडिया’ चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये श्रद्धा कपूरला पाहिल्यानंतर प्रेक्षक ‘स्त्री 2’चा अंदाज लावू लागले आहेत. दरम्यान, ‘स्त्री’ आणि ‘भेडिया’ या दोन्ही चित्रपटाची निर्मिती अमर कौशिकने केली आहे.

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘भेडिया’
‘भेडिया’ चित्रपट येत्या 25 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘भेडिया’ चित्रपट ‘कॉमेडी हॉरर सिनेमा’ आहे. यामध्ये वरुण एका ‘मिलिट्री ऑफिसर खेत्रपाल’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटाचे शुटींग हे अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलात करण्यात आले आहे. खरंतर हा चित्रपट 2020 पूर्वीच रिलीज होणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट फार लांबणीवर पडला.चित्रपटात मोठ्या प्रमाणात विएफेक्स इफेक्ट्स प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. वरुण धवल आणि कृती सेनन यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात अभिनेते अभिषेक बॅनर्जी आणि दीपक हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

‘भेडिया’ चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलरची प्रेक्षकांना भुरळ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -