Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन सूर्यवंशी,83 चित्रपटानंतर आता 'थालाईवी ' चे प्रदर्शन लांबणीवर

सूर्यवंशी,83 चित्रपटानंतर आता ‘थालाईवी ‘ चे प्रदर्शन लांबणीवर

काही दिवसांपूर्वी 'थलाईवी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच त्याची रिलीज डेट देखील घोषित करण्यात आली होती.

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे ब्रेक द चेनया मोहिमे अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध आखून दिले आहेत. शनिवार रविवार कडक संचारबंदी तसेच इतर दिवशी जमावबंदी लागू करण्यात आली आहे . याच नियमांच पालन करत सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा लांबवण्यात आल्या आहेत . सूर्यवंशी ,83 यांसारख्या बिग बजेट चित्रपटानंतर आता  कंगना रनौत चा बहुचर्चित आगामी थालाईवीचित्रपटाची रिलीज डेट सुद्धा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी थलाईवीचित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच त्याची रिलीज डेट देखील घोषित करण्यात आली होती. याआधी २३ एप्रिल ही प्रदर्शनाची तारीख ठरवण्यात आली होती. पण देशभरामध्ये कोरोना चा वाढता प्रसार पाहता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे

तमिळनाडू च्या दिवंगत मुख्यमंत्री तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित थलाईवीहा चित्रपट आहे.या चित्रपटात जयललिता यांची भूमिका सकरणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रसारित करण्यात आला होता. ट्रेलर प्रदर्शना नंतर कंगना चे सर्व स्तरावरुण कौतुक करण्यात आले होते. खुद्द खिलाडी अक्षय कुमारने कंगनाला फोन करून तिची प्रशंसा केली असे कंगना ने एका ट्विट द्वारे म्हंटले होते.

- Advertisement -