घरCORONA UPDATECorona Live Update: अभिनेत्री एश्वर्या राय बच्चन देखील नानावटी रुग्णालयात दाखल

Corona Live Update: अभिनेत्री एश्वर्या राय बच्चन देखील नानावटी रुग्णालयात दाखल

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून घरीच क्वारंटाईन राहून काळजी घेत असलेली अभिनेत्री एश्वर्या राय बच्चनला देखील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मुलगी आराध्याला आई एश्वर्यासोबत नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

 


मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ४९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजार ७५१ वर पोहचली आहे. तर ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ५२० वर पोहचला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

नवी मुंबईत २४० तर पनवेलमध्ये १४५ कोरोना रुग्ण वाढले!

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शुक्रवारी २४० नवे कोरोना रुग्ण वाढले, तर पनवेल मनपा क्षेत्रात आणखी १४५ रुग्णांची भर पडली.

नवी मुंबईतील रुग्णांची संख्या १०७८६ इतकी झाली असून त्यातील ६७३२ रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत ३७२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ३३० जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेलमधील एकूण रुग्णांची संख्या ४६१४ इतकी असून ३०७४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. १४३२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेलमध्ये आतापर्यंत १०८ जणांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात २४ तासांत ८,३०८ नवे रूग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३०८ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २५८ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ९२ हजार ५८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात २ हजार २१७ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ६० हजार ३५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (सविस्तर वाचा)


गणेशमूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीचे पूजन करावे, सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे देशासह राज्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे उत्सवांच्या आनंदावर विरजण पडले आहे. नागरिकांना सण उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. (Maharashtra Government issues guidelines for celebrating Ganesh Utsav)


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत आज घोषणा केली. त्यानुसार येत्या सोमवारपासून कोल्हापूर जिल्हा पुढील सात दिवस लॉकडाऊन असणार आहे. ( Complete Lockdown In Kolhapur )


गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना!

सार्वजनिक गणेशोत्सव-२०२० साजरा करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना! pic.twitter.com/oqNtb5xGm5

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 17, 2020


धारावी परिसरात आज १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ४३८ झाला असून यापैकी सध्या १०२ active केसेस असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.


१६ जुलैपर्यंत देशात १ कोटी ३० लाख ७२ हजार ७१८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल ३ लाख ३३ हजार २२८ नमुन्यांच्या झाल्या असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.


मुंबईतील उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अधिकाऱ्याची नुकतीच काही मंत्र्यासोबत एका विषयावर बैठक पार पडली होती. या अधिकाऱ्याचे मुंबई पोलीस १ आयुक्त कार्यालयातील दालन सील करण्यात आलेले असून आजूबाजूच्या परिसर सॅनिटाईझ करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


औरंगाबादमध्ये ८८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार ८३२वर पोहोचला असून आतापर्यंत ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे.


पुण्यातील कोरोनाबाधित संख्येत आणखी वाढ झाली आहे. पुण्यात एका रात्रीत २९२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत ४५ हजार २६०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ हजार २१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


देशात २४ तासांत सर्वाधिक ३४ हजार ९५६ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ३ हजार ८३२वर पोहोचला असून मृतांचा आकडा २५ हजार ६०२ झाला आहे.


पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात २ हजार १३२ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३८ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या १ हजार २१४वर पोहोचली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ९६८ झाली आहे. तसेच आतापर्यंत एकूण २८ हजार ९२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


अमेरिकेत कोरोना विषाणूचा सर्वाधिक कहर सुरूच आहे. अमेरिकेत एका दिवसात ६८ हजारांहून जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ९००हून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ लाखांच्या पुढे गेला आहे.


संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ३९ लाखांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ५ लाख ९२ हजारांहून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे ८२ लाख ७६ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिका, ब्राझील आणि भारत देशात आहेत.


राज्यात गुरुवारी ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी दिवसभरात २६६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ८४ हजार २८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ५८ हजार १४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -